महाराष्ट्र

कथा रायगडाची आणि शिवस्मारकाची

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांची ३४१वी पुण्यतिथी चैत्र पौर्णिमा (२७ एप्रिल २०२१) यादिवशी येत आहे. प्रतिवर्षी किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजिला जातो. त्यानिमित्त.

रायगडाचं महत्त्व इतर गडांपेक्षा तीन कारणांसाठी वेगळं आहे. स्वराज्याची राजधानी, महाराजांचा राज्याभिषेक आणि तिसरे म्हणजे याच रायगडावर महाराजांनी शेवटचा श्वास घेतला व ते अनंतात विलीन झाले. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने १८९५मध्ये ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा़’ची स्थापना झाली. प्रामुख्याने दोन उद्दिष्टे होती. पहिले म्हणजे गडावरील समाधीची व इतर वास्तूंची देखभाल- दुरूस्ती व जीर्णोद्धार आणि दुसरे म्हणजे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम करणे, शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे.

१८१८ मध्ये मराठेशाहीच्या अस्तानंतर ब्रिटिश काळात रायगड पूर्णत: दुर्लक्षित होता. १८८३मध्ये जेम्स डग्लस नावाच्या इंग्रज गृहस्थाने रायगडावर जाऊन तेथील दुरवस्थेचे वर्णन लिहिले. त्यामुळे भारतीय समाजात अस्वस्थता पसरली. १८८५ मध्ये रावबहादुर जोशी, लोकमान्य टिळक, न्या. तेलंग, न्या. रानडे, न्या. कुंटे इत्यादी समाजधुरिणांनी पुण्याला एका सभेचे आयोजन करून त्यात समाधी जीर्णोद्धाच्या कार्याचे सूतोवाच करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने सालाना ५ रुपये तजवीज करून ठेवली. पुढे ३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा जंगी सभेचे आयोजन केले. श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली सेनापती दाभाडे, लो. टिळक, बापूसाहेब कुरूंदवाडकर, सरदार पोतनीस, अनेक संस्थानिक, सरदार व पुण्यातील नामवंत व्यक्ती या सभेला उपस्थित होत्या. शिवस्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी फंड उभा करण्याचं आवाहन या सभेला केलं गेलं. त्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’. लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दि.२४ व २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस रायगडावर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवस्मारकासाठीचा यशस्वी संघर्ष
रायगडाचा ताबा ब्रिटिश सरकारकडे असल्याने मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराची परवानगी मागण्यात आली. पण ती ब्रिटिश सरकारने नाकारल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. त्यावेळचे मंडळाचे अध्यक्ष श्री. दाजी आबाजी खरे यांनी १९०६मध्ये ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टनकडे एक अर्ज दाखल केला. पुढे तब्बल १९ वर्षे संघर्ष केल्यावर लोकमान्य टिळकांच्या हयातीनंतर ‘रायगड स्मारक मंडळा’च्या पदाधिकाऱ्यांना यश आले व ६ फेब्रुवारी १९२५ला ब्रिटिश सरकारने मान्यता दिली. पुढील वर्षी १९२६मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची जीर्णोद्धार झालेली वास्तू उभी राहिली.

महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्याासाठी क्लिक करा

मंडळाची कामगिरी
मंडळाच्या वतीने आयोजित शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला गेल्या १२५ वर्षात विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. रायगड किल्याचा विकास व्हावा या हेतूने मंडळातर्फे पाहणी करण्यात येऊन महाराष्ट्र सरकारला १९८७मध्ये प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याने मंडळाला रोपवे उभारण्याची परवानगी दिली. त्यासाठी १९९६मध्ये मंडळाने पुण्यातील प्रसिद्ध ‘जोग इंजिनिअरिंग कंपनी’च्या सहाय्याने ‘रोपवे’ ची उभारणी केली. ज्यामुळे वर्षासाठी रायगडावर येण्याच्या शिवभक्तांची संख्या पंधरा हजारांवरून पाच लाखापर्यंत गेली. मागील १५ वर्षांमध्ये मंडळाने शिवपुण्यतिथीनिमित्त ‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील शूर सेनापती व सरदारांच्या वंशजांचा सन्मान, सध्याच्या लष्करातील एका निवृत्त मराठी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा सन्मान असे अनेक
उपक्रम सुरू केले आहेत. मंडळाच्या वतीने रायगड स्वच्छता मोहीमही आम्ही करतो आहोत. मंडळाने २०१२मध्ये केलेल्या सुधारित किल्ले रायगड विकास आराखड्यानुसार महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या
अध्यक्षतेखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले. त्यातील अनेक कामे आता सुरू झाली आहेत. पण अजूनही बरीच कामे शिल्लक आहेत.

शिवप्रेमींना आवाहन
लोकसहभागातून ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’च्या वतीने गडावर होणारा हा कार्यक्रम यंदा कोरोना महासाथीमुळे स्थगित करण्यात आला आहे. त्याऐवजी शिवपुण्यतिथीच्या दिवशी सकाळी ११ वाजता आपापल्या घरीच शिवप्रतिमेचे पूजन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
-जगदीश कदम
( लेखक ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’चे माजी अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT