MPSC exam 1.png 
महाराष्ट्र बातम्या

परीक्षांसाठी लॉकडाउनमध्येही सवलत ! 14 मार्च रोजी 'एमपीएससी'ची राज्यसेवा पूर्व परीक्षा

तात्या लांडगे

सोलापूर : नागपूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून नागपूरचा लॉकडाउन 14 मार्चपर्यंत वाढविला आहे. आहे. तर काही जिल्ह्यांनी लॉकडाउनच्या दृष्टीने तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. मात्र, 14 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे. त्यामुळे पूर्वनियोजित सर्व परीक्षा कोरोनाचे नियम पाळून घेतल्या जातील, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यादृष्टीने ठोस नियोजन करावे अशा सूचनाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

नागपूर महापालिका आयुक्‍तांनी काढले आदेश 
राज्य सेवेची पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च रोजी होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यभरातील सुमारे आठशे केंद्रांवरून सरासरी 12 लाखांपर्यंत उमेदवार एमपीएससीची परीक्षा देणार आहेत. ज्या जिल्ह्यांनी लॉकडाउन केलेला आहे, अथवा परीक्षा कालावधीत लॉकडाउनचा निर्णय झाल्यास, या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यातून सवलत द्यावी, असे स्पष्ट निर्देश शासन स्तरावरून संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त व पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागपूर महापालिकेचे आयुक्‍त राधाकृष्णन बी. यांनी राष्ट्रीय, राज्य अथवा विद्यापीठीय परीक्षांना परवानगी असल्याचे लॉकडाउनच्या आदेशात नमूद केले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव काही जिल्ह्यांमध्ये वाढू लागला आहे. त्यामध्ये सोलापूर, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत व्हावी, या हेतूने काही जिल्ह्यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. नागपूरमध्ये 7 मार्चऐवजी आता 14 मार्चपर्यंत लॉकडाउन राहणार आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातही लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाउन काळात परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जागोजागी पोलिसांची नाकाबंदी आणि प्रवासी नसल्याने बंद असलेल्या वाहतुकीमुळे त्यांना अडचणी येण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय, राज्य अथवा विद्यापीठांच्या पूर्वनियोजित परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना सवलत दिली जाणार आहे. जेणेकरून ते परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहचू शकतील, असा त्यामागे हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे ठाकरे बंधुंनी काय केलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

Hardik Pandya : २० षटकार, ११ चौकार... हार्दिक पांड्याला आली लहर अन् करतोय कहर; १९ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक अन्...

Latest Maharashtra News Updates Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा; चंपा चौकात सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त

S26 येण्याआधीच Samsung चा मोठा धमाका! S25 Ultra मोबाईलवर थेट 58 हजारचा डिस्काउंट; खरेदीसाठी लागल्या रांगा, कुठे सुरुय ऑफर पाहा

लेकाशिवाय आयुष्य अपूर्ण, पण त्याचं स्वप्न पूर्ण करेन; वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल ७५ टक्के संपत्ती दान करणार, ३५ हजार कोटींची नेटवर्थ

SCROLL FOR NEXT