Lingeshwar Vidyalaya Sindhudurg esakal
महाराष्ट्र बातम्या

कामगारांच्या डोक्यावरील ओझं होणार कमी; सिंधुदुर्गातील नववीच्या विद्यार्थ्यांनी बनवलं खास 'उपकरण', काय आहे खासियत?

कामगारांच्या डोक्यावरील ओझे हलके करण्याचा प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

वजनाने अत्यंत हलक्या असणाऱ्या प्लायवूडच्या फळ्यांचा वापर करून हे उपकरण केले आहे.

कुडाळ : डोक्यावर विटा, वाळूची घमेली घेऊन जाणारे कामगार कायमच नजरेसमोर येतात. अशा कामगारांच्या डोक्यावरील ओझे हलके करण्याचा प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला आहे. दप्तराप्रमाणे बेल्टच्या साहाय्याने खांद्यावर अडकविता येणारे हलक्या लाकडाच्या फळ्यांपासून विद्यार्थ्यांनी सहज ‘फोल्ड’ होणारे उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे डोके आणि मानेवरील ओझे उतरणार असून कामगारांना काहीशी विश्रांती मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg) तुळसुली (ता. कुडाळ) येथील लिंगेश्‍वर विद्यालय (Lingeshwar Vidyalay) व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता नववीतील लखन मेस्त्री आणि जतिन वेंगुर्लेकर यांनी हे वैशिष्ट्यपूर्ण उपकरण तयार केले आहे. वजनाने अत्यंत हलक्या असणाऱ्या प्लायवूडच्या फळ्यांचा वापर करून हे उपकरण केले आहे. ते खांद्यावर लावल्यास डोक्यावर एका छोट्या फळीचा आधार मिळतो आणि त्यावर घमेले किंवा वीटा यांसारखे वजन ठेवणे शक्य होते.

परिणामी डोक्यावर ताण येत नाही, शिवाय त्याला बॅटरीच्या साहाय्याने दिव्याची सोय केल्याने अंधारातही त्याचा वापर करता येतो. हे उपकरण ‘फोल्ड’ होत असल्याने काही वेळा बसण्यासाठी, आराम करण्यासाठी त्याचा यशस्वी वापर केला जाऊ शकतो. लखन म्हणाला, ‘‘अत्यंत कमी खर्चात हे उपकरण तयार करता येते. त्यामुळे कामगारांच्या डोक्यावरील ओझे उतरणार आहे.

कोणासाठी उपयुक्त ठरेल उपकरण?

  • वीटा उचलणारे कामगार

  • डोक्यावर भाजीपाला नेणारे

  • बांधकाम कामगार

  • डोक्यावर ओझे वाहून नेणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कामगारांसाठी

उपकरणाचे फायदे

  • कमी श्रमात जास्त काम, डोक्यावरील आणि मानेवरील भार होतोय कमी, शरीराचा योग्य समतोल.

  • रात्रीच्या वेळेही काम करणे शक्य

  • काम करून थकल्यानंतर बसण्यासाठी आसन व्यवस्था, उपकरण वाहतुकीस सोपे, दुपारी काम करताना डोक्यावर राहणार सावली.

लखन मेस्त्री आणि जतिन वेंगुर्लेकर यांनी आठवीमध्ये असताना, हे उपकरण तयार केले. सुरूवातीला हे उपकरण तालुका स्तरावरील प्रदर्शनात सादर केले. त्यावेळी या उपकरणाला पहिला क्रमांक मिळाला, त्यानंतर हे उपकरण जिल्हा स्पर्धेतही अव्वल ठरले. त्यानंतर राज्य स्तरावर उपकरणाच्या प्रकल्पाची निवड झाली. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ५० व्या बाल वैज्ञानिक प्रदर्शनात या प्रकल्पाची निवड केली.

-विलास राठोड, शिक्षक, लिंगेश्‍वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (तुळसुली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT