स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडल्या राज्यपालांसमोर व्यथा!
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडल्या राज्यपालांसमोर व्यथा! Canva
महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडल्या राज्यपालांसमोर व्यथा!

अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा महेश घरबुडे व शर्मिला येवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्यासमोर मांडल्या.

करमाळा (सोलापूर) : राज्यातील स्पर्धा परीक्षा (Competitive exams) देणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा करमाळा (Karmala) तालुक्‍यातील मिरगव्हाण (Mirgavhan) येथील महेश घरबुडे (Mahesh Gharbude) व नगर (Nagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्‍यातील इंदोरी (Indori) येथील शर्मिला येवले (Sharmila Yewale) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्यासमोर मांडल्या. यापूर्वी त्यांनी पुण्यात आंदोलन (Agitation) केले होते. राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत.

राज्यपालांना भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले, की राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरवात झाल्यापासून बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दोन वर्षांत सरकारी नोकर भरतीवर अप्रत्यक्ष बंदीच सरकारने आणली आहे. त्यामुळे स्वप्नील लोणकर व इतर होतकरू तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात स्पर्धा परीक्षा करणारे तरुण खूप नैराश्‍यात आहेत. सरकारकडून उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. एमपीएससीच्या गट- क, कृषी सेवा व वन सेवा या 2020 च्या जाहिराती 2021 संपायला आले तरीही आलेल्या नाहीत. ही पदभरती तत्काळ जाहीर करावी.

फेब्रुवारी 2021 मध्ये झालेली आरोग्य भरती व इतर सरळसेवा परीक्षांमध्ये खासगी कंपन्यांद्वारा होत असलेला गैरव्यवहार थांबविण्यासाठी गट- क आणि गट- ड पदांच्या सर्व परीक्षा एमपीएससीद्वारे घेण्यात याव्यात, दोन वर्षांत कोरोनाचे थैमान असताना स्पर्धा परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत आणि नवीन जाहिरातीही आलेल्या नाहीत. त्यामुळे कित्येक विद्यार्थी वय संपल्यामुळे एजबार झालेले आहेत. म्हणून सरसकट सगळ्या परीक्षांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची सूट जाहीर करावी, एमपीएससीचे वेळापत्रक एमपीएससीप्रमाणे एक वर्षाआधी जाहीर करण्यात यावे, एमपीएससीचे काही सदस्य येणाऱ्या काळात निवृत्त होत आहेत, त्यांची निवड प्रक्रिया आताच सुरू करावी, एमपीएससीवर कार्याचा भार बघता एमपीएससीची एकूण सदस्य संख्या 15 ते 20 पर्यंत वाढविण्यात यावी अशा मागण्या त्यांनी राज्यपालांसमोर मांडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईव्हीएम अन् ओटीपी... वायकर-किर्तीकर मतमोजणी प्रकरणात ECI अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Internet Problem : फोनमध्ये फुल नेटवर्क,पण इंटरनेट चालत नाहीये? पटकन वापरा 'या' ट्रिक्स

Sleepiness In Office : काम भरपूर आहे पण ऑफिसमध्ये सतत येतेय झोप, या छोट्या गोष्टींनी झोप उडेल आकाशी

Pankaja Munde: अन् पंकजा मुंडेंनी हंबरडा फोडला...लोकसभा पराभवामुळे जीवन संपवलेल्या युवकाच्या घरी कल्लोळ!

ZP Teacher Recruitment : चाळीसगाव तालुक्यात शिक्षकांची 38 पदे रिक्त; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण

SCROLL FOR NEXT