students.jpg 
महाराष्ट्र बातम्या

शिवरायांचे मावळे आम्ही..गड-किल्ले बांधू चला..

राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : हिंदवी स्वराज्यातील गड कोट किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले रुजावे. किल्ल्यांचे स्वराज्यातील योगदानाची माहीती मिळावी.या उपक्रमांतुन कलागुणांना वाव मिळावा. संगमेश्वरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी दिपावली पर्वात मातीचे किल्ले बनवत आनंद जोपासला. मुख्याध्यापक विकास मंडळ यांच्या कल्पकतेने या चिमुकल्यांची शुक्रवारी (ता.१८) गड, किल्ले बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली.पहिली ते चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग २७ किल्ल्याच्या प्रतिकृती साकरत शिक्षक व पालक यांना वेगळा अनुभव मिळाला. विद्यार्थी दशेतच अशा अनुभवातून कौशल्य विकसित होत असते असे शिक्षकांनी सांगितले. 

'पाणी आडवा, पाणी जिरवा' ,झाडे लावा, झाडे जगवा' संदेश देणारे फलक

मातीचे किल्ले बनवितांनाच विद्यार्थ्यांनी 'पाणी आडवा, पाणी जिरवा' ,झाडे लावा, झाडे जगवा  असे संदेश देणारे फलक लावले होते.या किल्ल्याच्या प्रदर्शनाला महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. जे. आर. आहिरे, सदस्य राजीव वडगे, शालेय अध्यक्ष अशोक फराटे यांच्यासह पालक, विद्यार्थी यांनी भेट देवून या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शिक्षिका लिलाबाई जगताप, वंदना शिंदे, संगिता जाधव, योगिता देवरे, अंकुश कुवर, श्रेयशा वाघ, महेश सोनजे, चेतन वाघ, किर्ती पगारे, राजेंद्र आहिरे, सुवर्णा अहिरे, सविता बच्छाव यांनी किल्ले बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. 

प्रतिक्रिया
शहरातील विद्यार्थ्यांना किल्ले बनविण्यातुन वेगळी अनुभूती मिळाली.चिखल मातीच्या वापरातुन कलात्मक कौशल्य विकास साधला जातो. कार्यानुभव व कला विषयाचे अध्ययन अनुभव यातुन मिळतात.- विकास मंडळ, मुख्याध्यापक.

पूर्वी दिवाळीच्या निमित्ताने पश्र्चिम महाराष्ट्रात गड कोट किल्ले बनविण्याची स्पर्धा होत असते.अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे.- सुनील वडगे, अध्यक्ष,  महात्मा फुले शिक्षण संस्था
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

लोककल्याणाची गाथा आणि भक्तीचा वसा ! अभंग तुकाराम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, या तारखेला रिलीज होणार सिनेमा

Rohit Arya Encounter: 'बाथरुम'मधून पोलिस आत शिरले अन्.., कसा घडला किडनॅपरच्या एन्काऊंटरचा थरार?

IND A vs SA A 1st Test: विराटची कसोटीतील जागा रिषभ पंतला मिळाली? फोटोमुळे चर्चा; मुंबईच्या गोलंदाजाने गाजवला पहिला दिवस

Latest Marathi News Live Update : रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रांचकडे

SCROLL FOR NEXT