Success Story 
महाराष्ट्र बातम्या

Success Story : कठोर परिश्रमातून महिलेने फुलवली नैसर्गिक शेती; वर्षाकाठी कमावतात ७ ते८ लाख रुपये

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : निसर्गाचा लहरीपणा, उत्पादन खर्चातील भरमसाठ वाढ आणि शेती उत्पादकतेतील सततची घट व नापिकी, यामुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. मात्र खैरगाव (ता. समुद्रपूर, जि. वर्धा) येथील शोभा गायधने या जिद्दी महिलेने दिवसरात्र अपार कष्ट करून नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखविला आहे.

त्यांनी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर न करता भरघोस पीक घेऊन स्वतःचा तर विकास साधलाच, शिवाय इतरही शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला आहे.

कृषी भूषण पुरस्कारप्राप्त शोभा ह्या २१ वर्षांपासून (२००२ पासून) नैसर्गिक शेती करीत आहेत. नऊवारी साडी, डोक्यावर पदर आणि कपाळावर ठाशीव कुंकू असा अस्सल ग्रामीण पेहराव असलेल्या शोभा अस्सल मातीतल्या शेतकरी. रासायनिक खतांचा अजिबात वापर न करता नैसर्गिक शेतीला त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्याकडे १५ एकर शेती आहे.

यात त्या हळद, गहू, तूर, चना, लिंबू, शेवगा, भाजीपाला आदी पिके घेतात. यातून खर्च वजा जाता त्यांना वार्षिक ७ ते ८ लाख रुपयांचा नफा होतो. निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेवून ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत शोभा यांनी शेतामध्ये ५० मीटरचे शेततळे तयार केले.

यामुळे २४ तास पाणी उपलब्ध झाल्याने सिंचनाची सुविधा निर्माण झाली. महागडी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे साहजिकच उत्पादन खर्चही कमी झाला. कीटकनाशकांना पर्याय म्हणून त्या दशपर्णी व निंबोळी अर्काचा वापर करून पिकांवर फवारणी करतात. ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी केल्यास अधिक परिणामकारक राहात असल्याचे शोभा यांनी सांगितले.

इतरही शेतकरी घेताच मार्गदर्शन

शोभा आपल्या शेतात चवळी, टमाटर, कोहळे, मिरची आदी भाजीपाल्यांची पिके घेतात. रासायनिक खतांचा वापर होत नसल्याने विषमुक्त भाजीपाला परिसरातील नागरिकांना मिळू लागला आहे. विषमुक्त शेतीसाठी आवश्यक असलेले कडुनिंब, करंजी, महारूख, सीताफळ, धोत्रा, रूईअर्क तयार करण्यासाठी त्या जीवामृत व घटकांचा शेतात वापर करतात.

त्यांचे मार्गदर्शन इतरही शेतकरी घेत असल्यामुळे परिसरातील शेती उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होत आहे. हळदीचे गुणधर्म ग्राहकांना पटवून देण्यासाठी त्या आपल्या शेतामध्ये हळदीचे उत्पादन घेऊन व त्यावर प्रक्रिया करून ग्राहकांना हळद उपलब्ध करून देतात. त्यांनी हळदीचे बेणे, कच्ची हळद, कांडी पावडर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित

शोभा यांच्या मेहनतीची शासनानेही दखल घेवून गतवर्षी त्यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा कसदारपणा कमी होतो. याऊलट नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि कमी खर्चामुळे शेती अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक शेतीकडे वळावे, असा सल्ला शोभा गायधने यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT