sudhir mungantiwar on sanjay raut 
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेसोबत राऊतांचं मनही अस्थिर होईल, त्यामुळं..

'महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे आणि बहुमत नसेल तर योग्य तो निर्णय घ्यावा'

सकाळ डिजिटल टीम

'महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे आणि बहुमत नसेल तर योग्य तो निर्णय घ्यावा'

राज्यातील आघाडी सरकारने आत्मचिंतन करावे. बहुमत नसेल तर महाविकास आघाडीनं योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्ला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना खासदार राऊत यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे. खासदार राऊतांच मन अस्थिर झाल्यानं ते टीका करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आज ते नागपूर येथे बोलत होते. (sudhir mungantiwar on sanjay raut)

राज्यपाल कोश्यारी यांच्यासंदर्भात सवाल केला असता, ते म्हणाले, कोणतही पत्र दिल्यानंतर त्यासंदर्भात महाराष्ट्राच्या प्रशासनाकडून खुलासा आणि माहिती करुन घेणं हे राज्यापालांचे कर्तव्य आहे. (maharashtra politics) त्यामुळे इतर कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती अस्थिर असताना काही लोक जीआर काढून पैसे कमवण्याचे काम करत आहेत, अशी शंका आल्याने हे पत्र दिले आहे. त्यामुळे राज्यपालांनी राज्यसरकारच्या निर्णयाची माहिती घेणे योग्यच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांना राऊतांनी दिलेल्या सल्ल्यावर मुनगंटीवार म्हणाले की, राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करण्याची गरज नाही. महाराष्ट्रात अस्थिरता वाढेल तसे राऊतांचे मनही अस्थिर होणार आहे, त्यामुळे ते काय बोलतील याची कल्पना नाही. पुढील काही दिवस राज्याच्या राजाकारणात राऊतांकडून अनेक नवीन शब्द ऐकायला मिळतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होऊ नये, अशा अस्थिर परिस्थितीत प्रगत महाराष्ट्रासाठी भाजप निश्चितपणे वेट अॅंड वॉच या भूमिकेत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT