raut
raut sakal
महाराष्ट्र

राऊत मुंबईत दाखल होताच भाजप नेत्यांचे टीकास्त्र; म्हणाले,‘गजा मारणे'चही...

सकाळ डिजिटल टीम

ईडी(ED) कारवाई नंतर शिवसेना नेते संजय राऊत हे आज मुंबईत दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. राऊत मुंबईत दाखल होताच भाजप नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले, शिवसैनिक हे राऊतांच्या चुकाचं समर्थन करणारचं. यावेळी त्यांनी राऊतांची बरोबरी पुण्यातील गुंडाशी केली. ते म्हणाले पुण्यातील गुंड गजानन मारणे सुटल्यावर त्याचेही असेच स्वागत केले गेले. जंगी स्वागत केलं म्हणजे तो व्यक्ती आदर्श आहे असे नाही असा घणाघात केला. पुढे ते म्हणाले, मानसशास्त्राचा एक सिध्दांन्त आहे. जेव्हा समाजाच वाईट करणाऱ्याच्या मागे पाठीशी उभ राहण्याचं ठरवतो. तेव्हा सज्जन माणसाला देखील वाईट कृत्य करावं अस वाटतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अतुल भातखळकर म्हणाले, राऊतांच स्वागत नसून, हा तर नंगा नाच चालु आहे. संजय राऊत हे स्वातंत्र्य सैनिक आहेत का असा सवाल त्यांनी केला. भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृतीच प्रतीक आहे यांच्या स्वागतासाठी भगवा झेंडा वापरला जात आहे हे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, राऊत अर्वाच्य भाषेत ते शिवी देतात नेमके कोण आहेत संजय राऊत.दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो अशी मराठीत म्हण आहे.असा हा प्रकार आहे. राऊतांनी हे धंदे बंद करून एवढी संपत्ती कशी गोळा केली याचे उत्तर महाराष्ट्राला द्यावे असे खडेबोल सुनावले. संजय राऊतांनी अजून नाटकं केली तर भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील असा इशारा भातखळकर यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT