महाराष्ट्र

जयंत पाटलांना प्रत्युत्तर देत मुनगंटीवारांचेही 'झिंग झिंग झिंगाट'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी काल (सोमवार) विधानसभेत फडणवीस सरकारवर हल्लाबोल करताना गाजलेल्या 'झिंग झिंग झिंगाट' गाण्याचे विडंबन केले होते. आज त्या झिंगाटला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याच शैलीत उत्तर दिले.

मुंनगंटीवारांनी केलेले विडंबन पुढीलप्रमाणे :

त्यांच्या उरात होतीय धडधड
ज्यांची क्षणात सत्ता गेली
झाली जनतेच्या रागाची बाधा
घड्याळ हातात फुटून गेली
समदं झ्याक झालंया
कमळ धनुष्यबाण फुलून आलंया
आरं राहुलच्या खेम्यात, राष्ट्रवादीच्या कोमात
राजही रडतोया

झाल झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट
चल विकास करुया, साथ मोदींजींची आहे
थकलेले विरोधक कसं टुकूर टुकूर पाहे
त्याला थकत राहू दे , की बघत राहू दे
प्रगतीची ही ट्रेन आहे बुलेट ट्रेन
आता बुगाट जाऊ दे, जाऊ दे

आरं झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट
समद्या राज्याला झालीया आमच्या विजयाची घाई
शिवधनुष्य सोबत येणार ही शिवशाही
छत्रपतींच्या नावानं आणि आदर भावानं
चालवू हे शासन, उत्तम प्रशासन जनतेला देऊनी गाऊया झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT