Sudhir mungantiwar on chhatrapati shivaji maharaj wagh nakh bhawani talwar bringing back from Britan  sudhir mungantiwar
महाराष्ट्र बातम्या

Wagh Nakh : शिवरायांच्या वाघनखांबद्दल मुनगंटीवारांची मोठी घोषणा; म्हणाले, 'राज्याभिषेकापर्यंत…'

सकाळ डिजिटल टीम

भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केल्यावरून वापरल्याने राज्यातील वातावरण काही दिवसांपासून चांगलेच तापलं आहे. यादरम्यान शिंदे-फडणवीस सरकारचे सांस्कृतीक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी शिवरायांच्या वाघनखांबद्दल मोठी घोषणा केली आहे.

शिवरायांनी अफझल खान वधाच्या वेळी वापरलेली वाघनंखं परत मिळावीत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा सुरू असून लवकरच बैठक होणार असल्याची असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराज यांच्या भवानी तलवारीबद्दल देखील अशीच घोषणा केली होती. त्यानंतर आता वाघनखं देखील परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली ही वाघनखं आणि भवानी तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याबद्दल माहिती देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "भवानी तलवार आणि अफझल खानाला ज्या वाघनखांनी संपवलं ते देखील तीथेच (ब्रिटन) आहेत. राज्याभिषेकापर्यंत हे दोन्ही परत यावेत असा आमचा प्रयत्न आहे. पुढे काय होईल मला माहिती नाही. कारण हा आंतराष्ट्रीय विषय आहे."

"वाघनखं ब्रिटनमध्ये आहेत. याचं सर्टिफीकेट मागवलं आहे. जेव्हा हे वाघनखं ब्रिटीश सरकारला दिले ते सर्टिफीकेट देखील मिळालं आहे. त्याच्या आधारावर पहिली बैठक अमित शाह यांच्यासोबत होईल. याबद्दल ब्रिटनच्या पंतप्रधानांना देखील पत्र लिहीले आहे. गरज पडल्यास केंद्राच्या परवानगीने ब्रिटन सरकारसोबत देखील चर्चा करू" असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT