Shivsena NCP May Exchange Ministry  e sakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची अदलाबदल? मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसनं (Congress) नाराजी व्यक्त केली आहे. आज वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक तासांपासून बैठक झाली. त्यानंतर आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (BJP MLA Sudhir Mungantiwar) यांनी गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा अधिवेशनात होती, असं मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेनेला गृहविभाग का पाहिजे? कदाचित राष्ट्रवादीच्या गोटात देखील त्यांना मुख्यमंत्रिपद पाहिजे, अशी मागणी आहे. त्याची चर्चा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होती. तशी अदलाबदल होणार असेल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मुख्यमंत्री-गृहमंत्रिपदाची अदलाबदल होणार असेल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

गृहमंत्रिपदापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठं आहे. गृहमंत्री सुडाच्या भावनेनं कारवाई करत नसेल तर ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला गृहविभाग कशासाठी पाहिजे? शिवसेनेवर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेला गृहविभाग पाहिजे आहे. दिलीप वळसे पाटील अशा सूडघेऊ भावनेनं मंत्रिपद चालवत नाहीत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतोय, असंही मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवारांच्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराची प्रतिक्रिया -

आज एप्रिल फूल आहे. त्यामुळे मुनगंटीवारांच्या विधानावर कितपत विश्वास ठेवायचा? हे ठरवायला पाहिजे. आमच्या महाविकास आघाडीत काय चालू आहे याची काळजी मुनगंटीवारांनी करू नये. शक्ती कायद्याला भाजपचा विरोध होता. कारण शक्ती कायद्यामध्ये भाजपचे लोक अडकू शकतात. आमच्याकडे मंत्रिपदाच्या अदलाबदलीची कुठलीही बातमी नाही. एप्रिल फूलमुळे त्यांनी असं बालिश वक्तव्य केलं असावं, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun : थारची रिक्षाला भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू; चिमुकल्यासह आई-वडिलांचा मृतांमध्ये समावेश

Suryakumar Yadav Catch: बाऊंड्री लाईन मागे केली होती...! सूर्याच्या 'त्या' अविश्वसनीय कॅचवर भारतीय खेळाडूचा धक्कादायक दावा

Pune Airport : पुण्यात पावसाचा फटका; विमानसेवा विस्कळित, प्रवाशांची गैरसोय

Latest Marathi News Live Updates : उड्डाणपूल तयार पण नेत्यांना उद्घाटनाला वेळ मिळेना, सिंहगड रस्ता 'जॅम'

Mobile Recharge Price Increase : मोबाईल रिचार्ज महागले; 'या' बड्या कंपनीने बंद केला लोकप्रिय प्लॅन, ग्राहकांमध्ये संताप..

SCROLL FOR NEXT