Sudhir Mungantiwar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांच्या अडचणी वाढणार? प्रचारसभेत काँग्रेसबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल

Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मोदींच्या प्रचारसभेवेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. अशातच सभा, प्रचार यांना सुरवात झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभे दरम्यान केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपचे चंद्रपूरचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मोदींच्या प्रचारसभेवेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवर पोस्ट करत, निवडणूक आयोगाला टॅग करून मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पोस्टवर उत्तर देत निवडणूक आयोगाने 'आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे' असे सांगितले आहे.

सचिन सावंत यांचं ट्विट

निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. "एका भावाला बहिणीबरोबर " सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच "आप"च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. @ECISVEEP ने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे.

@CEO_Maharashtra या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल.

सावंत यांच्या पोस्टवर निवडणूक आयोगाचे उत्तर

सावंत यांच्या या पोस्टवर उत्तर देत निवडणूक आयोगाने 'आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे' असे सांगितले आहे. "आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. निवडणूक काळातील कोणत्याही गैरप्रकाराबद्दल आपण cVigil या अॅपवर तक्रार दाखल करू शकता. प्रत्येक तक्रारीवर १०० मिनीटांमध्ये पहिली कार्यवाही.अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्याला भेट द्या."

व्हायरल झालेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर

१९८४ साली काँग्रेस ने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेस ने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. १९८४ च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोक पणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही. वंदे मातरम!!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT