माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील नव्हते मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे.(Sudhir Mungantiwar uddhav thackeray interview shivsena crisis in maharashtra)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. राऊतांनी अनेक सवाल उपस्थित केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. असे आव्हान केले.
हाच मुद्दा पकडत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ''कौटुंबिक मुलाखत द्यायची आणि इतरांना गद्दार म्हणायचं. २०१९ च्या निकालानंतर तुमच्याबाबत जनता हेच बोलत होती. माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील नव्हते मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले?'' असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना केला.
तसेच, सूडाचं राजकारण नको म्हणता मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस, राणेंवर अजामीन पत्र गुन्हा दाखल केला. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार नाही असं म्हटलं तरी १४ दिवस जेलमध्ये टाकलं. सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून माजी सैनिकांचा डोळा फोडायचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद भाष्य काँग्रेसनं करूनही तोंडाला फेविकॉल लावून गप्प बसायचं असा टोलाही भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला.
नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले?
माझं त्यांना आव्हान आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडिलांबद्दल आदर आहे. तसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई-वडिलांबद्दल आदर असला पाहिजे. गेल्याच आठवडय़ात गुरुपौर्णिमा झाली. मी माझ्या वडिलांना आणि आजोबांना गुरू मानतो. प्रत्येकाने मातृदेवभव, पितृदेवभव असं देव मानले पाहिजेत.
स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. आज माझ्या दुर्दैवाने माझे आई-वडील माझ्यासोबत असे नाहीयेत, पण ते माझ्यात आहेत असे मी मानतो. पण ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. मी तर म्हणेन असा आशीर्वाद दुसरा मिळू शकत नाही.
त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.