Sugar Factories
Sugar Factories esakal
महाराष्ट्र

वाढीव उसाच्या एफआरपीचे कारखान्यांसमोर आव्हान; साखरेचे दर पाच वर्षांपासून स्थिर, 5 वर्षांत 750 रुपयांची झाली वाढ

निवास चौगले

इथेनॉल निर्मितीचे बदललेले धोरण, साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी आणि देशांतर्गत बाजारातील साखरेचे उतरलेले दर यामुळे यावर्षीचीच एफआरपी देणे अडचणीचे बनले.

कोल्हापूर : पाच वर्षांत उसाच्या एफआरपीत (Sugarcane FRP) पाचवेळा वाढ झाली. पण, २०१९ पासून साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवरच आहे. परिणामी, पुढील हंगामासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी देणे साखर कारखान्यांसमोर (Sugar Factories) मोठे आव्हान असणार आहे.

दरम्यान, इथेनॉल निर्मितीचे बदललेले धोरण, साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी आणि देशांतर्गत बाजारातील साखरेचे उतरलेले दर यामुळे यावर्षीचीच एफआरपी देणे अडचणीचे बनले. त्यात पुढील वर्षासाठी प्रतिटन ३४०० रुपये एफआरपी केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केली. मिळणारे उत्पन्न व शेतकऱ्यांना (Farmers) द्यावे लागणारे पैसे याचा ताळमेळ घालताना कारखानदारांची दमछाक होणार आहे.

दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय म्हणून साखर उद्येागाकडे पाहिले जाते. हा उद्येाग नेहमीच या ना त्या कारणांने आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. केंद्र शासनाने साखर उद्येागास पूरक निर्णय घेतले. परंतु, नैसर्गिक कारणाने यावर्षीच्या हंगामात साखर उत्पादन कमी होणार, असे अंदाजित केले. यामुळे साखर निर्यातीस बंदी, इथेनॅाल उत्पादनामध्ये पन्नास टक्के कपात, असे निर्णय घेतल्याने तसेच फेब्रुवारी २०२४ मध्ये साखर उत्पादनात अंदाजापेक्षा वाढ होणारे आकडे बाहेर पडल्याने देशांतर्गत बाजारपेठेत असणारे प्रती क्विंटल ३७०० ते ३८०० रुपये असलेले साखरेचे दर आज ३३५० ते ३४०० पर्यंत खाली आले आहेत.

यावर्षी साखर कारखान्यांनी वाढलेले साखरेचे दर व इथेनॅाल उत्पादनातून मिळणारा नफ्याचा विचार करून एफआरपीपेक्षा जादा दर जाहीर केले. परंतु, ईशान्येकडील राज्यांची मागणी कमी, केंद्र शासनाने गतवर्षीपेक्षा जादा दिलेले साखर विक्रीचे कोटे, इथेनॅाल उत्पादनात कपात त्यामुळे अंदाजापेक्षा जादा साखर उत्पादन होणार व कोणतीही टंचाई येणार नाही, याचा अंदाज व्यापाऱ्यांना आला. साखर विक्रीत स्पर्धा नाही, संक्रांत सणाची मागणी संपल्याने व फेब्रुवारी येऊनही वातावरणात कडक उन्हाळा नसल्याने शीतपेये, आईस्क्रिम उद्येागाकडून मागणीत वाढ नाही. या कारणाने बाजारातील साखरेचे भाव घसरले.

२०१९ मध्ये केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रती क्विंटल ३१०० रुपये केला. त्यावेळी एफआरपी प्रती टन २७५० रुपये होती. त्यानंतर पाचवेळा एफआरपीत वाढ होऊन पुढील हंगामात ती ३४०० रुपये प्रती क्विंटल द्यावी लागणार असताना साखरेच्या दरात कोणतीही वाढ नाही. साखरेचा हमीभाव प्रती क्विंटल ४२०० रुपये केल्याशिवाय वाढीव एफआरपी देताच येणार नाही, अशी स्थिती आहे. अन्यथा, पुढील हंगामात अर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले कारखाने बंदच ठेवावे लागतील, अशी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

साखरेचे दर वाढले, निर्यात साखरेचा कोटा वाढवला तरच पुढच्या वर्षीच्या हंगामातील वाढीव एफआरपी देणे शक्य आहे. लोकसभा निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार काय निर्णय घेणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

-के. पी. पाटील, अध्यक्ष, बिद्री कारखाना

अशी मिळणार रक्कम (२०२४-२५ चा हंगाम)

  • साखर उतारा (टक्के) ११.०० ११.५० १२.०० १२.५०

  • १०.२५ साठी एफआरपी ३४०० ३४०० ३४०० ३४००

  • पुढील १ टक्क्यासाठी २४९ ४१५ ५८१ ७४७

  • एकूण एफआरपी ३६४९ ३८१५ ३९८१ ४१४७

  • वजा तोडणी ९०० ९०० ९०० ९००

  • प्रत्यक्ष मिळणारी रक्कम २७४९ २९१५ ३०८१ ३२४७

२०१९ पासून वाढलेली एफआरपी अशी (प्रतिटन)

  • २०१९-२०- २७५०

  • २०२०-२१- २८५०

  • २०२१-२२- २९००

  • २०२२-२३- ३०५०

  • २०२३-२४- ३१५०

  • २०२४-२५- ३४००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT