Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी तरुणांची आत्महत्या, सरकारकडून १० लाखांची मदत; पण, दिलेले चेक झाले बाउन्स

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांपैकी दोन तरुणांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून १० लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं. सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना चेकही देण्यात आले. मात्र, हे चेक बाउन्स झाले आहेत. तहसीलदारांची सही न जुळल्यामुळे हे चेक बाउन्स झाल्याची माहिती आहे.

सरकार आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची अवहेलना करत असल्याचा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. तर सरकारने आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची अवहेलना थांबवावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील सुनील बाबुराव कावळे (वय ४०) यांनी आत्महत्या केली होती.

त्यांच्यापाठोपाठ २६ ऑक्टोबर रोजी गणेश काकासाहेब कुबेर यांनी देखील आरक्षणासाठी आपतगाव येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी दोन तरुणांनी आत्महत्या केल्यानंतर समाज आक्रमक झाला. या घटनेनंतर संतप्त तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.

दोन्ही मृत तरुणांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या आणि मयताच्या वारसाला शासकीय नोकरी द्या, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यावेळी गावकऱ्यांनी घेतली होती. दरम्यान, सरकारने दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली. मदतीचे १० लाख रुपयांचे चेक तहसीलदारांची सही न जुळल्याने बाउन्स झाले.

मात्र, याविषयी आंदोलकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मात्र आरटीजीएसद्वारे (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) रक्कम वितरित करण्यात आली. तर, एका कुटुंबाला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT