politics esakal
महाराष्ट्र बातम्या

'पवारांविषयीची केतकी चितळेची फेसबुक पोस्ट घाणेरडी अन् चुकीची'

'एवढ्या मोठ्या आणि ज्येष्ठ नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरणे अयोग्य'

सकाळ डिजिटल टीम

'एवढ्या मोठ्या आणि ज्येष्ठ नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरणे अयोग्य'

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सध्या राज्यात गदारोळ निर्माण झाला आहे. यावरुन वाद सुरु असून या वादाच्या पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी लिहण्यात आलेली फेसबुक पोस्ट घाणेरडी आणि चुकीची होती, असे त्यांनी म्हटलं आहे.

इतक्या मोठ्या आणि ज्येष्ठ नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरणे अयोग्य असल्याचेही सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांना आदराचं स्थान असून जगभरातील कॅन्सरच्या रुग्णांसाठी पवार हे एक प्रेरणा आहेत. कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटतात, भाषणं करतात. त्यामुळे केतकीने लिहलेली ती पोस्ट घाणेरडी असल्याचं ते म्हणाले आहेत.

अशाप्रकारच्या ट्रोलिंगमुळे नेत्यांचं मानसिक आरोग्य बिघडू शकते. केतकी चितळेचे वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर धोरणांवर, भूमिकांवर आणि राजकारणावर टीका करा. पण कुणाच्या अंगावर, दिसण्यावर नाही, असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले.

दरम्यान, केतकी चितळे हिच्या फेसबुक पोस्टनंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. केतकी चितळे हिच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. ठाणे सत्र न्यायालयाने रविवारी झालेल्या सुनावणीवेळी केतकी चितळे हिला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. १८ मे रोजी तिला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. तोपर्यंत ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून केतकी चितळे हिची चौकशी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT