Mla Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mla Disqualification Case: तारीख पे तारीख! शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेची सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर, 'या' तारखेला होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयातील आमदार अपात्रतेची सुनावणी सलग चौथ्यांदा लांबणीवर

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणातील घडामोडी सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रा प्रकरणाची सुनावणी आता पुन्हा एकदा महिनाभरासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी ३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.

यापूर्वी ही सुनावणी 9 ऑक्टोबरला पार पडणार होती. सलग चौथ्यांदा आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. आधी सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणावरील सुनावणीसाठी आधी 3 ऑक्टोबर, नंतर 6 ऑक्टोबर आणि त्यानंतर आता 9 ऑक्टोबर वरून आता थेट 3 नोव्हेंबर तारीख देण्यात आलेली आहे.

आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची ही या महिनाभरातील चौथी वेळ आहे. याआधी तीनवेळा या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. १६ आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. मात्र, सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याने ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आमदार अपात्रतेसंबधीची याचिका दाखल केली होती. कोर्टाने यावर सुनावणी घेत १६ आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. त्यासंबधीही सुनावणी सुरू आहे.

मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं.

आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेलं वेळापत्रक

13 तारखेला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही यावर सुनावणी

13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करणार

20 ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला देणार

20 ऑक्टोबरला काही अधिकची कागदपत्रे एखाद्या गटाला सादर करायची असतील तर त्यासाठी संधी दिली जाणार

27 ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं ( स्टेटमेंट) मांडणार

6 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपली बाजू मुद्देसूद मांडतील. त्यानंतर दावे आणि प्रतिदावे करतील

10 नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडणार

20 नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाणार

23 नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार

सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT