Sharad Pawar Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना दिलासा मिळणार? विधानसभा अध्यक्षांविरोधात दोन्ही याचिकांवर आज सुनावणी

विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची पवार - ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयातला विनंती करण्यात आली होती.

रोहित कणसे

नवी दिल्ली : राज्यातील दोन राजकीय पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर यांच्यात प्रत्येकी दोन गट पडले आहे. या दोन पक्षातील चार गटांकडून मूळ पक्ष आमचाच असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान आमदार अपात्रतेत्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि शिवसेनाचा उद्धव ठाकरे गट यांच्या याचिकेवर आज सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात या दोन्ही याचिका करण्यात आल्या आहेत. आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याची तक्रार या दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची मागणी पवार - ठाकरे गटाने केली आहे.

आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात केली आहे. यावर आज सकाळी सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्षांना वारंवार पत्राद्वारे विनंती करूनही आमदारांच्या अपात्रतेवर वेळकाढूपण केला जात असल्याचा मुद्दा शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टासमोर मांडला आहे.

त्यामुळे दोन्ही याचिका एकाच वेळी सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी याचिका दाखल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान आजच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राहुल नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT