Supreme Court Latest News Supreme Court Latest News
महाराष्ट्र बातम्या

supreme court : मोठी बातमी! सत्ता संघर्षाची सुनावणी १२ तारखेला होण्याची शक्यता

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Supreme Court Latest News मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सोमवारी (ता. ८) सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता शुक्रवारी (ता. १२) होणार असल्याची माहिती आहे. सुनावणीसाठी जे खंडपीठ बसणार होते, ते सोमवारी बसणार नसल्याची माहिती आहे. यामुळे राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयाची आणखी चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाकडे राजकारण्यांपासून सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. यामुळेच जवळपास दीड महिना होत असतानाही राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतरच विस्तार होईल, असे वृत्त असताना सुनावणी लांबल्याने आणखी वाट पाहावी लागणार आहे.

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जे खंडपीठ सोमवारी बसणार होते ते सोमवारी बसणार नसल्याची माहिती आहे. ते खंडपीठ आता शुक्रवारी बसणार असल्याची माहिती आहे. यामुळे राज्य सरकारला १६ बंडखोर आमदारांचे निलंबन, निवडणूक आयोग, शिवसेना (Shiv sena) पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे या सर्वांच्या निर्णयासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

शिदे गट व उद्धव ठाकरे यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात याचिका टाकल्यापासून आजवर अनेक तारखा देण्यात आल्या आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही. निर्णय न आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारही होऊ शकलेला नाही. दुसरीकडे प्रतीक्षा वाढतच जात आहे. मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ८ ऑगस्ट ही तारीख दिली होती.

मात्र, आता ८ ऑगस्टला सुनावणी होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ही सुनावणी शुक्रवारी म्हणजे १२ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे समजते. यामुळे राजकीय पक्षांना आणखी चार दिवस आणखी जास्त वाट पाहावी लागणार आहे. सुनावणी लांबल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबतो का? हेच आता पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st ODI Live: रोहित, विराटच्या पुनरागमनाचा फुसका बार... ऑस्ट्रेलियाच्या डावपेचांसमोर भारताची हार! मालिकेत आघाडी

एआयच्या सहाय्याने बनलेली पहिली ‘महाभारत’ मालिका लवकरच येणार !

Thane News: मनसेने दिला ठाकरे गटाला मान! विद्युत रोषणाई कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

Mokhada ST Bus : ऐण सणात भंगारात निघालेल्या बस प्रवाशांच्या सेवेला, जव्हार आगाराचा गलथान कारभार, प्रवासी त्रस्त

Nashik Police : चोरट्यांसाठी आयती संधी? 'माझा शेजारी, खरा पहारेकरी' उपक्रमावर पोलिसांचा भर

SCROLL FOR NEXT