Supriya Sule : sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : ११ कोटीच्या कामात मोठा गैरप्रकार; एसआयटी चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप

Pune Rain News: खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी; कात्रज चौकात पाहणी दौरा

सकाळ वृत्तसेवा

Pune News: ड्रेनेज, पावसाळी लाईनसह रस्त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा रस्ते खोदाई नको आहे. शहर व उपनगर मान्सूनपूर्व पावसाने रस्त्यांना आलेले ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले असून पावसाळीपूर्व ११ कोटीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत पालिका प्रशासनाच्या कारभारावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी ताशेरे ओढले.

'कात्रज ते नवले पूल बाह्यवळण महामार्ग व वंडरसिटी ते माऊली नगर उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार असून गडकरी साहेबांनी निधी दिला असल्याने काम सुरू आहे.

मात्र त्याला गती देणे गरजेचे असल्याचे सुळे म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, अमृता बाबर, नमेश बाबर, दीपक गुजर, अनिल कोंढरे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

...तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू

पुणे शहरात सातत्याने क्राईम, ड्रग्ज प्रकार वाढत आहेत. तसेच, मूलभूत सुविधा व विकास कामात पालिका प्रशासन कमी पडत आहे. यावरून

पुण्यात पालिका व पोलीस प्रशासन नक्की आहे की नाही समजत नाही. या विरोधात लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT