Sharad Pawar Supriya Sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

Video : ''वडील म्हणून पवार साहेब कसे आहेत?'' सुप्रिया सुळेंनी सांगितली आठवण

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीमध्ये शरद पवारांच्या स्वभावाचा उलगडा केला आहे. यासह त्यांनी अनेक राजकीय प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत.

येत्या रविवारी अवधूत गुप्ते यांचा 'खुपते तिथे गुप्ते' हा शो प्रसारित होणार आहे. त्याचा प्रोमोशनल व्हिडीओ जारी करण्यात आलेला असून त्यामध्ये सुप्रिया सुळे शरद पवार यांच्याबद्दल बोलत आहेत.

अवधूत गुप्ते सुप्रिया सुळेंना विचारतात की, ''वडील म्हणून पवार साहेब कसे आहेत?'' त्यावर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांनी दिलेला सल्ला आणि त्यांच्या स्वभावाबद्दल भाष्य केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार साहेब खूप कमी बोलतात आणि फार मार्गदर्शन करत नाहीत. जेव्हा मी पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा त्यांनी मला एक सल्ला दिला होता. तो मला आजही आठवतो.

त्या पुढे म्हणाल्या की, तेव्हा पवार साहेब मला म्हणाले होते की, तू खासदार म्हणून चालली आहेस.. गेट नंबर एकने जावून लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेत. एक कायम लक्षात ठेव बारामती मतदारसंघातील मतदारांमुळे तुला ही संधी मिळाली आहे. दरवेळी पायऱ्या चढताना हे विसरु नकोस. ज्या दिवशी तू हे विसरशील तेव्हा तुला ह्या पायऱ्या चढता येणार नाहीत, असा सल्ला शरद पवारांनी दिल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

दिल्लीतल्या 'सहा जनपथ'वरील हा किस्सा सुप्रिया सुळेंनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सांगितला. याच कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले होते. अजित पवार यांच्यासोबतचे जुने फोटो बघितल्यानंतर त्या भावुक झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही, काही लोकांनी मिळून वेगळी भूमिका घेतली आहे असा पुरुच्चार त्यांनी यावेळी केला.

शिवाय अजित पवार गटाला पक्षाने नोटीस पाठवलेली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघत आहोत, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Devendra Fadnavis: 'धुरंधर नेते, आधुनिक चाणक्य'; देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्रवादी नेत्याचे खास बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

SCROLL FOR NEXT