cyrus mistry death ncp supriya sule reaction on cyrus mistry death in road accident palghar  
महाराष्ट्र बातम्या

Cyrus Mistry: मिस्त्रींच्या अपघातानंतर लावतेय सीटबेल्ट; सुप्रिया सुळे झाल्या भावूक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी कार अपघातात निधन झाले. अपघाताच्या वेळी सायरस कारच्या मागच्या सीटवर होते. मात्र त्यांनी सीटबेल्ट लावला नव्हता. सायरस यांच्या अपघातामुळे रस्ता सुरक्षेबाबतही चर्चेला उधाण आले आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे सीटबेल्टचे महत्त्व सांगताना सारस मिस्त्री यांच्या आठवणीत भावूक झाल्या. (Supriya sule and cyrus mistry news in Marathi)

सायरस माझे भाऊ आणि चांगले मित्र होते. आमचे खूप गोड नाते होते. त्यांचे माझ्या पतीसोबतही चांगले संबंध होते. आमची मुलं एकाच शाळेत शिकली आहेत. त्यांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

दरम्यान केंद्र सरकार लवकरच कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीटबेल्ट लावणे अनिवार्य करणार आहे. याबाबत सुप्रिया म्हणाल्या, "मी सकाळीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरीजींचे आभार मानले आहेत. संसदेत आम्ही फक्त भांडत नाही. गडकरी साहेब चांगल्या सूचना घेऊन येतात. देशहितासाठी आम्ही सर्व खासदार एकत्र उभे आहोत. आम्ही सुरक्षिततेबद्दल खूप बोलतो पण मी देखील कधी सीट बेल्ट वापरला नाही, पण सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर मी सीटबेल्ट वापरण्यास सुरुवात केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता मी कोणाशीही बोलले तरी रस्ता सुरक्षेबाबत बोलणार. तुम्ही रस्त्याने चालत असाल तरी सतर्क असायला हवं. मोटारसायकल चालवणारे बरेच लोक फोनवर बोलत असतात. अपघात झाल्यावर आम्हाला वाटतं की बदल घडवून आणला पाहिजे. प्रश्न लोकांच्या जीवनाचा आहे. त्यामुळे कृपया दुचाकी चालवताना फोनवर बोलू नका असंही आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT