Suresh Jain Esakal
महाराष्ट्र बातम्या

Suresh Jain: ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याने लोकसभेच्या धामधुमीत केला जय महाराष्ट्र! काय सांगितलं कारण ?

Suresh Jain: राज्याच्या राजकारणातील माजी मंत्री आणि शिवसेनेतील जेष्ठ नेते सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाचेया प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी दिला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणातील माजी मंत्री आणि शिवसेनेतील जेष्ठ नेते सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाचेया प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी दिला आहे. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला असून त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.

सुरेश जैन हे सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सलग ३४ वर्षे आमदार पद सांभाळले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा त्यांना मंत्रिपद दिले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश जैन यांनी केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांना संधी दिली होती. २०१४ पासून ते प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते, सामाजातील नागरीक, व्यापारी वर्ग, त्याचबरोबर उद्योजक यांच्यासह सर्वसामान्या नागरीकांमध्ये देखील त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.

काय लिहलं आहे पत्रात?

युवावस्थेत म्हणजेच १९७४ पासून (४० वर्ष) मी राजकारणात सहभाग घेत आलो आहे. १९८० पासून सक्रीय राजकारणात प्रवेश केला. ३४ वर्ष मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केले आणि हिन्दुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवून शिवसेनेच्या माध्यमातून मला जनतेच्या सेवेसाठी सर्वप्रथम मंत्रीपद देऊन मी करीत असलेल्या चांगल्या कामाची पावती दिली.

२०१४ नंतर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या कारणामुळे मी हळूहळू सक्रीय राजकारणातून बाहेर पडलो. आता आयुष्याच्या या अंतीम टप्प्यात सक्रीय राजकारणात कोणताही भाग न घेता निवृत्त व्हायचे ठरविले आहे. म्हणून मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा सादर करीत आहे. तो मान्य करण्यात यावा हि विनंती. या नंतर जो कोणी जिल्ह्याचा, शहराचा, राज्याचा, देशाच्या विकासाचे व्हिजन घेऊन काम करित असेल त्यासर्वांसाठी मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिल.

आपण स्वतः तसेच सर्व शिवसेना नेते आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारे कोटीच्या संख्येत असलेले शिवसैनिकांनी जे मला स्नेह दिले त्या बद्दल मी आपल्या सगळ्यांच्या प्रेमात राहू इच्छितो. आदरणीय बाळासाहेबांचे आशिर्वाद पाठीशी होते आणि राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT