Sushama Andhare refuses to apologize writes open letter in sanskrut over privilege motion neelam gorhe  
महाराष्ट्र बातम्या

Sushama Andhare : 'माफी मागणार नाही...'; अंधारेंनी थेट संस्कृतमध्ये लिहीलं नीलम गोऱ्हेंना पत्र

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

रोहित कणसे

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितली होती. यानंतर अंधारे यांनी आठ दिवसात पत्र लिहून दिलगीरी व्यक्त केली नाही, तर त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यास परवानगी देऊ असे गोऱ्हे म्हणाल्या होत्या. या पार्श्वभूमिवर सुषमा अंधारे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आता सुषमा अंधारे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी एका जाहीर पत्रातून माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई केली जाऊ शकते. अंधारे यांनी लिहिलेल्या या पत्रात मी माफी मागणार नाही. मग त्यासाठी मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका घेतली आहे.

पत्र संस्कृतमध्ये का?

"हिंदुत्वाची आधारशीला असणारे सर्व ग्रंथ वेद श्रुतीस्मृती पुराणे ही संस्कृतमधूनच लिहिलेली आहेत. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्याला, आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असे म्हणत गद्दारीचे समर्थन करणाऱ्यांना संस्कृत यायलाच हवे. म्हणून हे पत्र संस्कृत मधून लिहिले." असे म्हणत अंधारे यांनी त्यांची भूमिका मांडणारे हे पत्र लोकशाहीला उद्देशून संस्कृतमधून लिहीले आहे.

सुषमा अंधारे यांचं पत्र मराठीत जसंच्या तसं ...

(विधिमंडळाच्या सभागृहाला जरी पत्र संस्कृत मध्ये लिहिले असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेला या पत्राचा मजकूर करावा म्हणून मराठी भाषांतर येथे दिले आहे.)

प्रति

सभापती, विधान परिषद

महाराष्ट्र राज्य

संदर्भ: दिनांक 20 12 2023 रोजी माझ्या संदर्भात सभापती पदाच्या खुर्चीवरून हक्क भंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या निर्देशाबाबत..

प्रिय लोकशाही

तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे.

स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळात ही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचे मला भान आहे.

व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.

पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील 'व्यक्तीने' माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले,किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुरमु जी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला अगदी तितक्याच अनाहुत, नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे.

पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे. सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत पण जर खरेच अशी गरिमा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना किंवा सभापती पदावरील व्यक्तीला कळत असेल तर मग या सभापती पदाचे किंवा या सभागृहाचे अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबार मध्ये मंत्री असणारे श्री चंद्रकांत जी पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही.

किंवा महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आ .प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे तात्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही.

_सभापती पदावरील व्यक्तीने आठ दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका श्री चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही? किंवा महापुरुषांचा अपमान आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही असे दरेकर किंवा मुनगंटीवार किंवा त्यांच्या सुरात सूर मिसळून सभागृहामध्ये गोंगाट करणारा प्रत्येक सदस्य त्यांनी ही भूमिका का घेतली नाही?

_ की मग सभापती पदावरील व्यक्ती श्रीमती गोरे या छ. शिवाजी महाराज, म. फुले, राजर्षी शाहू महाराज या सगळ्या महापुरुषांच्या पेक्षाही वरच्या स्तरावर आणि परमादरणीय आहेत का ? की जेणेकरून त्यांच्या संबंधाने नकळत निघालेला शब्द सुद्धा अपमान म्हणून गृहीत धरला जातो मात्र राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान सगळे भाजपचे आमदार आणि स्वतः सभापती पदावरील व्यक्ती मूग गिळून सहन करतात.

प्रिय लोकशाही , माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही..!!! भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Latest Marathi News Update LIVE: नाशिकच्या मोरे मळ्यात दहशत संपली! अखेर बिबट्या जेरबंद

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

SCROLL FOR NEXT