CBI Sushant Singh Rajput Death Probe sakal
महाराष्ट्र बातम्या

Sushant Singh Rajput: सुशांतच्या बहिणीचा मोठा दावा, अभिनेत्याच्या मृत्यूबाबत सीबीआय करणार मोठे खुलासे

Shweta Singh Kirti: श्वेता सिंग कीर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावाच्या मृत्यूच्या सीबीआय तपासात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Sushant Singh Rajput Death Probe:

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बहीण श्वेता सिंग कीर्ती यांनी नुकताच मोठा दावा केला आहे.

श्वेता सिंग कीर्ती यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट करत सांगितले की, सुशांतच्या मृत्यूची चौकशी करणारी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) लवकरच या प्रकरणाशी संबंधित मोठे खुलासे करणार आहे.

श्वेता सिंग कीर्ती यांनी दोन दिवसांपूर्वी X वर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावाच्या मृत्यूच्या सीबीआय तपासात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

"माझ्या भावाच्या निधनाला ४५ महिने झाले असून, सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासाबाबत आम्हाला अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप करावा ही विनंती. कारण एक कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण एकमेकांशी झगडत आहोत. सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. आणि सीबीआयचा तपास कुठेपर्यंत पोहचला आहे, हे कळण्यासाठी तुमचा हस्तक्षेप खरोखरच मदत करेल," असे श्वेता सिंग किर्ती यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

सुशांत सिंग राजपूत वांद्रे येथील जॉगर्स पार्कजवळील माँट ब्लँक अपार्टमेंटमध्ये सहाव्या मजल्यावरील डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच्यासोबत दोन कूक आणि एक कामगार असायचा.

दरम्यान चित्रपटसृष्टीतील सुशांतचा एक मित्रही त्याच्यासोबत तेथे तात्पुरता राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 जून 2020 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास उघडकीस आली, जेव्हा सुशांतच्या घरातील कामगाराच्या लक्षात आले की तो बराच वेळ त्याच्या बेडरूममधून बाहेर आला नाही.

पोलिसांनी, सुशांतच्या मृत्यूची वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही बाजूंनी चौकशी केली होती. अभिनेत्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी बॉलिवूड अनेक कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांची चौकशी केली होती.

दरम्यान, सुशांतचे वडील केके सिंग यांनी 25 जुलै 2020 रोजी पाटणा पोलिसात तक्रार दाखल केली होती. नंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयने अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमावर पोलिसांचा ताबा; माजी महापौरांसह महापालिकेचे अधिकाऱ्यांना अडवले

SCROLL FOR NEXT