Sushma Andhare esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : शिंदे-फडणवीस सरकार येत्या पाच ते सहा महिन्यांत कोसळेल ; सुषमा अंधारे

सुषमा अंधारे; भाजपत आयारामांना स्थान

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीत आयारामांना स्थान तर निष्ठावंताना बाजूला केले जात आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने जाणीवपूर्वक बाजूला केले, असे अनेक नेते पक्षात दुखावले आहेत, असा आरोप करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येत्या पाच ते सहा महिन्यांत कोसळेल, असा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला. महाप्रबोधन यात्रेसाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्रीमती अंधारे म्हणाल्या, ‘‘ज्या सरकारातील आमदारांना पालकमंत्री विश्‍वासात घेत नसतील, त्यांना किंमत देत नसतील, त्यांना जाणीवपूर्वक पक्षपात करत असतील, तर सरकारात धुसफूस होणे साहजिक आहे. आमदार सुहास कांदे यांनी अलीकडेच पालकमंत्री दादा भुसे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील रवी राणा हे बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. खोक्यांप्रकरणी केस दाखल करायची झाल्यास प्रथम राणांवर करावी लागेल.’’

त्या म्हणाल्या, ‘‘श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजप अतिक्रमण करत आहे. प्रताप सरनाईकांचा मतदारसंघ भाजप मागत असून, त्यांच्यावर ईडीची टाच आणली जाते. हे प्रेशर पॉलिटिक्स सहनशक्तीपलीकडचे आहे. आढळराव-पाटील, अर्जुन खोतकर यांचे मतदारसंघही भाजप मागत आहे. हे एकनाथ शिंदे गटाला संपविणारे चित्र आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipal Election : मुंबईसाठी ‘राष्ट्रवादी’ची यादी जाहीर; भाजपला धक्का, मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Video: 'त्या' एका व्हिडिओमुळे जान्हवी किल्लेकर ट्रोल, संतापून उत्तर देत म्हणाली...'पुर्णपणे माहिती नसताना...'

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

farmer Success Story: माळरानावर फुलवली बोरांची बाग; कष्टातून मिळतय अडीच लाखांचे उत्पादन ; बोधेगावातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

SCROLL FOR NEXT