Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: फडणवीसांच्या डायलॉगबाजीवर अंधारे म्हणतात, 'तुमच्या घरात एक बाई घुसली अन्...'

फडणवीसांनी ठाकरेंना उत्तर देताना मी फडतूस नाही, तर काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा म्हटलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा उल्लेख केला होता. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेते आक्रमक झाल्याचे दिसुन आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरे यांना घरातून बाहेर पडणं मुश्किल करू असा इशारा दिला आहे. तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.

फडतूस नाही, तर काडतूस आहे. झुकेगा नही घुसेगा साला, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना उत्तर दिलं आहे. फडणवीस यांच्या या डायलॉगवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे यांनी ट्विट करत फडणवीसांना उत्तर दिलं आहे. "झुकेगा नही साला हा डायलॉग भारीच होता. पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घूसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला 7 वर्ष कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव?" असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूर येथे काल सावरकर गौरव यात्रा सुरू होती. यावेळी झालेल्या सभेवेळी देवेंद्र फडणवीसांनी संबोधित केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे आज मला फडतूस गृहमंत्री म्हणाले उद्धव ठाकरे फडतूस नही काडतूस हूँ मैं. झुकेगा नही साला घुसेगा… घुसेगा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितला फडतूस शब्दाचा अर्थ

खासदार संजय राऊत यांनी फडतूस या शब्दाचे चार अर्थ सांगितले आहेत. डिक्शनरीत हे अर्थ असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच कोर्टाने यापेक्षा अधिक कडक शब्दात तुमच्या सरकारवर ताशेरे ओढल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

डिक्शनरीत फडतूसचा शब्दाचा अर्थ दिलेला आहे. "वर्थलेस. मिनिंगलेस, यूजलेस आणि बिनकामाचे लोक आहेत", असा अर्थ डिक्शनरीत आहे असं ते यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT