Sushma Andhare esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : 'त्या फक्त चपात्या लाटून घाणेरडं राजकारण करतात', सुषमा अंधारेंवर मुंडेंची जोरदार टीका

संतोष कानडे

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांना सेवा देत चपात्या लाटल्या होत्या. त्याच्या व्हीडिओदेखील व्हायरल झाला होता. यावरुन ता मुंडेंनी त्यांचं नाव न घेता सुषमा अंधारे चपात्या लाटून घाणेरडं राजकारण करत आहेत, असं म्हटलं आहे.

आषाढी वारी २०२३ साठी वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखींचे १२ जून रोजी पुणे शहरात आगमन झाले. शहरातील नागरिकांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यादरम्यान पालखी सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दिंडीत सेवा दिल्याचं पाहायला मिळाले.

सुषमा अंधारे यांनी दिंडीतील वारकऱ्यांसाठीच्या पंगत सेवेदरम्यान चपात्या लाटतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे या वरकरी महिलांसोबत मोठ्या चपळाईने चपात्या लाटताना दिसत आहेत. या फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडोओवर लोक लाइक्स आणि कमेंट करत आहेत.

दरम्यान, करुणा धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट करुन सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे. 'ज्या महिलांना फराळ वाटप करुन वारकरी लोकांची सेवा करायला पाहिजे, त्या फक्त चपाती लाटून घाणेरडं राजकारण करतात! लाज वाटली पाहिजे' असं ट्वीट करुणा धनंजय मुंडे या फेसबुक अकाऊंटवरुन करण्यात आलेलं आहे.

करुणा मुंडे यांनी सुषमा अंधारे यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केल्याचं निदर्शनास येत आहे. कारण काल खासदार सुप्रिया सुळे यांनीही वारकऱ्यांना सेवा दिली. करुणा यांच्या पोस्टची सध्या सोशल मीडियामध्ये चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT