Gulabrao Patil  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Political News : गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेत्याची घणाघाती टीका

रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना न्यायालयानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला.

सकाळ डिजिटल टीम

रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं.

बुलढाणा : रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना न्यायालयानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला असून तुपकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची अकोला न्यायालयातून (Akola Court) सुटका झालीये.

दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. न्यायालयातून सुटका होताच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीये.

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे गुवाहाटीला (Guwahati) शेण खायला गेले होते का? असा संतप्त सवाल तुपकरांनी केलाय. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. उठसूठ कुणालाही फोन करत असतात. मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय, असा घणाघाती हल्लाही तुपकरांनी केला.

रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं. काल तुपकर बुलढाण्यात पोहोचले. त्यांचं कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोषात स्वागत केलं. यावेळी ते म्हणाले, गुलाबराव पाटील तुमचे घर काचेचे आहे. तुम्ही गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पानटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटलांना अनेकवेळा मंत्री केलं, त्या ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही गद्दारी केलीय. जे उपकार करणाऱ्या ठाकऱ्यांचे झाले नाहीत, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा इशाराही तुपकरांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT