'स्वाभिमानी'चे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे कोल्हापुरातील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.
Sangli Mseb Fire : शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) आंदोलन सुरूय. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडं सरकारचं दुर्लक्ष होत असल्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील महावितरणचं कार्यालय पेटवलंय. रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेत महावितरणचं (Sangli MSEB) लाखो रुपयांचं नुकसान झालंय.
शेतीसाठी दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांचे गेल्या सात दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. सरकार दरबारी या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक होत आहेत. त्यातूनच कसबे डिग्रज (Kasbe Digraj Sangli) येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. अद्याप याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही.
कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे होती. त्या सर्व कागदपत्रासह अन्य साहित्य जळून खाक झालं आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. हे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन विभागाचे कर्मचारी आग विझवण्याचे काम करत होते. पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलंय. याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.