health solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

आरोग्याची काळजी घ्याच! सोलापुरातील 7 लाख जणांना ‘हायब्लडप्रशेर’ तर 30 वर्षांवरील 13 टक्के लोकांना मधुमेह; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ सल्ला

एप्रिल २०२४ पासूसन वैद्यकीय तपासणी केलेल्या ३० वर्षांवरील प्रत्येक १०० जणांपैकी २३ जणांना उच्च रक्तदाब तर प्रत्येक १०० लोकांपैकी १३ जणांना मधुमेहाची लक्षणे आढळली आहेत. वाढत्या असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण पाहता सर्वांनी दैनंदिन जीवनशैली निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशा रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन नियमित उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करून घ्यावी.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ३० वर्षांवरील साडेआठ लाख लोकांची आरोग्य विभागाने १ एप्रिल २०२४ ते २० जुलै २०२५ या काळात तपासणी केली. त्यात तब्बल ९१ हजार जणांना मधुमेह व उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) असल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना नियमित तपासणीचा सल्ला देण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी केलेल्या ३० वर्षांवरील प्रत्येक १०० जणांपैकी २३ जणांना उच्च रक्तदाब तर प्रत्येक १०० लोकांपैकी १३ जणांना मधुमेह असल्याचेही समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यात ३० वर्षांवरील लोकसंख्या ३० लाखांवर आहे.

मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. एकाच ठिकाणी तासन्‌तास बसून काम करणे, अपुरी झोप, अवेळी जेवण अशी कारणे त्यामागे आहेत. दुसरीकडे अति मानसिक ताण, आनुवंशिकता, आहारात जंक किंवा फास्ट फूडचा समावेश, आहारात मिठाचे प्रमाण अधिक, जेवणाच्या व झोपण्याच्या वेळा न पाळणारी जीवनशैली, चिंता, राग, भीती, वजन जास्त, व्यायामाचा अभाव, अशा कारणांमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास उद्‌भवतो. याशिवाय महिलांमध्ये स्तन आणि गर्भाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र असून तरुणांमध्ये गुटखा, तंबाखूच्या व्यसनामुळे मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आढळली आहेत.

२०२२-२३ मध्ये साडेचार लोकांच्या तपासणीत २३ हजार जणांना उच्च रक्तदाब तर साडेतेरा हजार जणांना मधुमेह आढळला. तर २०२३-२४ या वर्षातील आरोग्य तपासणीत साडेनऊ लाखांमध्ये मधुमेहाचे ४८ हजार ३४१ तर उच्च रक्तदाबाचे ७६ हजार १८३ रूग्ण आढळले होते. आरोग्याची काळजी आणि शरीराला पुरक जीवनशैली, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, यातून आरोग्य सदृढ राहू शकते, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

कर्करोग अन्‌ लक्षणे...

१) मुख कर्करोग

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचा वाढत्या सेवनामुळे मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या कर्करोगाचा धोका तरुणांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. सर्वांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन त्वरित थांबवावे. तोंडामध्ये बऱ्याच दिवसापासून लाल किंवा पांढरा चट्टा आढळणे, पूर्णपणे तोंड उघडण्यास त्रास होणे, अशी या कर्करोगाची लक्षणे आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------

२) स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. वेळेत निदान झाल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. स्तनांमध्ये गाठ असणे किंवा दोन्ही स्तनाच्या आकारामध्ये फरक दिसणे, स्तनामधून अचानक स्त्राव होणे ही या कर्करोगाची लक्षणे आहेत. ३० वर्षांवरील स्त्रियांनी अशी लक्षणे आढळल्यास भीती न बाळगता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

--------------------------------------------------------------------------------------------

३) गर्भाशय मुख कर्करोग

रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये गर्भाशय मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. रजो निवृत्तीनंतर योनी मार्गातून रक्तस्त्राव होणे, ओटी पोटामध्ये वारंवार वेदना होणे, योनी मार्गातून पांढरा किंवा दुर्गंध स्त्राव होणे अशी या कर्करोगाची प्रमुख लक्षणे आहेत. अशा महिलांनी सोलापूर जिल्ह्यातील विशेष पायलट प्रोजेक्टमधून तपासणी करून घ्यावी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय तपासणी करता येईल.

नियमित उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करून घ्यावी

एप्रिल २०२४ पासूसन वैद्यकीय तपासणी केलेल्या ३० वर्षांवरील प्रत्येक १०० जणांपैकी २३ जणांना उच्च रक्तदाब तर प्रत्येक १०० लोकांपैकी १३ जणांना मधुमेहाची लक्षणे आढळली आहेत. वाढत्या असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण पाहता सर्वांनी दैनंदिन जीवनशैली निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशा रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन नियमित उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करून घ्यावी. जेणेकरून वेळेत उपचार करणे शक्य होईल व संभाव्य धोका टळेल.

- डॉ. ऐश्वर्या सातपुते, जिल्हा समन्वयक, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील असंसर्गजन्य आजारग्रस्त रूग्ण

  • एकूण वैद्यकीय तपासणी

  • ८,५०,०२१

  • उच्च रक्तदाब आढळलेले

  • ५५,७६१

  • मधुमेहासंदर्भातील तपासणी

  • ८,६०,१०६

  • मधुमेहाचे आढळलेले रूग्ण

  • ३५,८५३

  • कर्करोगाचे एकूण संशयित

  • ४४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

SCROLL FOR NEXT