Rupali Chakankar, Devendra Fadnavis and Manohar Bhide 
महाराष्ट्र बातम्या

Rupali Chakankar : मनोहर भिडे यांच्यावर तातडीने कारवाई करा; चाकणकरांची फडणवीसांकडे मागणी

रवींद्र देशमुख

Mumbai News - श्री शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. एकीकडे भाजप भाजपकडून भिडे यांचा बचाव करण्यात येत आहे. तर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याचवेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा अजित पवार गट भिडेंविरोधात आक्रमक झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिडे यांच्यावर कारवाई कऱण्याची मागणी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले तसेच लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल मनोहर भिडे यांनी केलेली वक्तव्य निंदनीय, निषेधार्ह आणि संतापजनक आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपित्याचा अवमान करणे तसेच त्यांच्या मातोश्री असलेल्या एका महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत जाहीरपणे आक्षेपार्ह भाष्य करणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

चाकणकर पुढे म्हणाल्या की, वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या मनोहर भिडेंवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी माझ्या विधानाचा विपर्यास केला असं म्हणून भिडे पळवाट शोधतात आणि त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही हे चुकीच आहे. महात्मा गांधींचा देश हीच भारताची जगभरातील ओळख आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा अपमान महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही हे शासनाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे, अशी मागणी चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Bank Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT