Shivsena Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: "तानाजी सावंत मंत्रिपदावर खूश नाहीत, त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं"

एकनाथ शिंदे यांच्यात हिम्मत नव्हती, असं म्हणायचंय का?

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी शिवसेनेत बंड केलं आणि राज्यातील सरकार कोसळलं. तेव्हापासून बंड केलेल्या समर्थक आमदार आणि खासदारांनी अनेक गौप्यस्फोट केले. काही दिवसांपूर्वी शिंदे समर्थक आणि आत्ताचे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता.

2019 पासून 2 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री तानाजी सावंत यांच्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी 100 ते 150 बैठका झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून मी धाराशिव जिल्हा परिषदेत राज्यातील पहिले बंड केले आणि भाजप शिवसेनेची सत्ता आणली. फडणवीस यांच्यासोबत मी बैठका घेत होतो. मी जे बोलतो ते करुन दाखवतो असं त्यांनी म्हंटलं होतं. त्यांच्या त्या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतला आहे.

सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या की, "मंत्री तानाजी सावंत हे त्यांना मिळालेल्या मंत्रीपदावर खूश नाहीत त्यांना कदाचित मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी आहे. त्यांना हे सांगायचं असेल की एकनाथ शिंदे यांच्यात सत्तापरिवर्तनाची धमाक, हिम्मत नव्हती. एकनाथ शिंदे यांनी सत्तांतरणसाठी काही केले नाही. जे काही केले ते मी 150 बैठका घेऊन केले.. हे त्यांना सांगायचं असेल, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत सांगतात मी 150 बैठका फडणवीस सोबत घेतल्या. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारीं यांच्यापेक्षा मी मोठी सभा पंढरपूर येथे घेतली असे मंत्री सावंत म्हणत आहेत, याचीही अंधारेंनी भाषणावेळी आठवण करून दिली आहे.

काय म्हणाले होते मंत्री तानाजी सावंत?

2019 पासून 2 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री तानाजीराव सावंत यांच्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी 100 ते 150 बैठका झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून मी धाराशिव जिल्हा परिषदेत राज्यातील पहिले बंड केले आणि भाजप शिवसेनेची सत्ता आणली. फडणवीस यांच्यासोबत मी बैठका घेत होतो. मी जे बोलतो ते करुन दाखवितो.

2019 पासूनच महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तापरिवर्तन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व मंत्री सावंत यांच्यात बैठका होत होत्या. आम्ही हे सगळं सांगून करीत होतो झाकून ठेवत नव्हतो , उजळ माथ्याने करीत होतो. सत्ता बदलण्याचे काम सुरु होते. मी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रमधील आमदार यांची मनधरणी करीत होतो असे मंत्री सावंत यांनी म्हंटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT