कृष्णा खोपडे  google
महाराष्ट्र बातम्या

भाजप आमदारावर TDR घोटाळ्याचा आरोप, अडचणी वाढणार?

चौकशी समितीच्या अहवालामध्ये हा घोटाळा उघडकीस आल्याचे समोर आले आहे

सकाळ डिजिटल टीम

चौकशी समितीच्या अहवालामध्ये हा घोटाळा उघडकीस आल्याचे समोर आले आहे

भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या यांच्यानंतर आता नागपुरातही भाजप नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार दिसत आहे. कारण सध्या नागपुरातील भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर टीडीआर घोटाळ्याचा आरोप होत आहे. चौकशी समितीच्या अहवालामध्ये हा घोटाळा उघडकीस आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांमागेही घोटाळे उघडकीचा सेसमिरा लागला आहे का ? असे सवाल उपस्थित होत आहे.

नागपुरातील भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर टीडीआर घोटाळ्याचा आरोप होत आहे. हा घोटाळा जुना आहे. सरकारी जमिनीवरच्या डीआर प्रकरणाचा आहे. हा जमीन खरंतर युएससीच्या अंतर्गत आरक्षण नसल्यानं टीडीआर घेऊन तो विकून हा सगळा व्यवहार करता येत नाही. यात कोर्टानं गुन्हे दाखल करून मग चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. मात्र महानगरपालिका आणि त्यावेळी राज्यांमध्ये फडणवीस सरकार असताना ही चौकशी पुढे जाताना दिसत नव्हती. मात्र आत यात राजकीय पैलु असल्याचे बोलले जात आहे.

नागपुरमध्ये महानगरपालिकेमध्ये असणार विरोधी पक्षनेते कॉंग्रसचे तानाजी वणवे यांनी भाजपा आमदार खोपडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात मुख्य सुत्रधार आमदार कृष्णा खोपडे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणात चौकशी झाली असुन हा गैरव्यवहार झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता हा संबंधित अहवाल अर्बन डेव्हलपमेंट मिनीस्ट्रीला सादर केला असून यावर कारावाई होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT