Maharashtra vidhan sabha 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

Teacher graduation elections postponed: दोन शिक्षक आणि दोन पदवीधर जागांसाठी ही निवडणूक होणार होती.

कार्तिक पुजारी

मुंबई- राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १० जून रोजी या निवडणुका होणार होत्या. दोन शिक्षक आणि दोन पदवीधर जागांसाठी ही निवडणूक होणार होती. या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

२ शिक्षक आणि २ पदवीधर जागेसाठी निवडणुका १० जून रोजी होतील असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं. पण, काही शिक्षक, पदवीधर संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता. शाळांना सुट्टी असल्याने मतदानावर परिणाम होईल, असं शिक्षक संघटनांचे म्हणणे होते. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने शिक्षक, पदवीधर निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकांची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई, नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या, पण त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

१० जून रोजी मतदान आणि १३ जून रोजी मतमोजणी असं नियोजन होतं. पण, शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने याबाबत विचार करुन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विलास पोतनीस (उद्धव ठाकरे गट), कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे (भाजप), मुंबई शिक्षकचे कपिल पाटील, नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे या चार रिक्त जागांसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

Latest Marathi News Live Update : दादर येथील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा

'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video

IPL 2026: 'विराट-रोहितला जसा पर्याय नाही, तसाच संजू सॅमसनलाही...'; राजस्थान रॉयल्सच्या ट्रेडवर काय म्हणाला नवा कर्णधार?

SCROLL FOR NEXT