महाराष्ट्र बातम्या

आश्चर्य! अध्ययनाची नवी पद्धत; हाताचा व्यायाम करा आणि वाचन शिका

हाताचा व्‍यायाम करीत वाचन करण्याची शिक्षक राजेश कोगदे यांनी विकसित केलेली अध्यापन पद्धती सध्या पळशी केंद्रातील जि.प. शाळेमध्ये चर्चेचा विषय आहे. या अध्यापन पद्धतीला मुलांकडून देखील पसंती मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar News:हाताचा व्‍यायाम करीत वाचन करण्याची शिक्षक राजेश कोगदे यांनी विकसित केलेली अध्यापन पद्धती सध्या पळशी केंद्रातील जि.प. शाळेमध्ये चर्चेचा विषय आहे. या अध्यापन पद्धतीला मुलांकडून देखील पसंती मिळत आहे.

पहिली, दुसरीत शिकणारी मुले म्हणजेच मुक्त स्वभावाची, त्यांच्याकडून परिणामकारक शिक्षण घडून यावे असे प्रत्येक शिक्षकाला वाटते. हीच किमया घडवून आणली ती खामगाव तालुक्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजेश वासुदेव कोगदे यांनी. त्‍यांनी कोरोना काळामध्ये घरोघरी जाऊन या पद्धतीने केवळ एक ते दीड महिन्यात इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना वाचन करायला शिकविले. ही पद्धती तेव्हा महाराष्ट्रात खूप शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांकरिता वापरली आणि आजही वापरत आहेत.

यामध्ये विद्यार्थी हातवाऱ्यांद्वारे बाराखडी शिकतात. परांपरागत पध्दतीपेक्षा शिक्षक राजेश कोगदे यांनी विकसीत केलेली पध्दती खुपच प्रभावी असून, विद्यार्थ्यांना या हातवाऱ्यांद्वारे अगदी कमी कालावधीत ही पध्दती शिकता येते. कोरोना काळामध्ये सुद्धा कोगदे सरांनी या पद्धतीने इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना केवळ एका महिन्यात वाचायला शिकविले. ऑनलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खूप शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांकरिता सरांकडून मार्गदर्शन घेतले आणि विद्यार्थी अतिशय आनंदाने, अचूकपणे वाचन करायला शिकले. सरांची वाचन शिकवण्याची पद्धत खूपच परिणामकारक आहे. या पद्धतीने त्यांच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी आनंदाने वाचन करायला शिकला व एकही विद्यार्थी वाचनात मागे नाही.

शिक्षक राजेश कोगदे यांनी विकसीत केलेली अध्यापन पध्दती अतिशय प्रभावी असून, वाचन करताना केवळ मनातल्‍या मनात किंवा कमी आवाजात ते न करताना हातापायांच्‍या हालचाली करुन वाचन केल्‍याने सर्व ज्ञानेंद्रीय केंद्रीत होतात. वाचन केलेले विद्यार्थ्यांच्‍या सर्व मुखपाठ होते. त्‍यांच्‍या या अध्यापनामुळे केंद्रातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी गोडी निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT