महाराष्ट्र बातम्या

Teacher Recruitment: शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग! जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती पवित्र प्रणालीवर दाखल

राज्यात शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Manoj Bhalerao, सकाळ डिजिटल टीम

Teacher Recruitment Update: राज्यात शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. वाशीम जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती पवित्र प्रणालीवर भरण्यात आली असून मान्यता मिळताच पुढील प्रक्रियेला सुरवात होईल, अशी माहिती शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरू करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे बहुप्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये घेतली होती.

सदर चाचणीसाठी नोंदणी केलेल्या दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांपैकी तब्बल दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे. तर आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठीची स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती रिसोड तालुक्यातील शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराने दिली आहे. (Latest Marathi News)

रोस्टर प्रक्रियेस सुरवात
राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि छोट्या स्थानिक संस्थांची रोस्टर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. तर काही मोठ्या खाजगी संस्थांची रोस्टर प्रक्रिया सुरू आहे. परिणामी येत्या दहा ते पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच खाजगी संस्थांच्या पद भरतीच्या जाहिराती सुरू होतील असे स्पष्ट संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant Injury: टीम इंडियाला धक्का! रिषभ पंतला बॉल लागला, पायातून रक्त आलं, गाडीत बसून सोडावं लागलं मैदान; Video

Revanth Reddy : रेवंत रेड्डींनी उपराष्ट्रपती पदाबाबत सूचवलं ‘हे’ मोठं नाव, अन् म्हणाले...

Navi Mumbai: नवी मुंबईतील बेकायदा धार्मिक स्थळांना दिलासा, नेमकं प्रकरण काय?

Sangli Youth Endlife : तांदूळवाडी येथील तरुण अभियंत्याने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Mumbai News: आता केस पेपरसाठी रांग लावावी लागणार नाही, पालिका रुग्णालये होणार पेपरलेस; कधीपासून? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT