महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षणातून वगळले; राज्य सरकारने केली निर्णयात दुरुस्ती

राज्याच्या तिजोरीवरील भार होणार हलका

युवराज पाटील

शिरोली पुलाची : मान्यताप्राप्त अनुदानित शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी दोन मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयात दुरुस्ती करीत नि:शुल्क शिक्षण नव्हे, तर विहित दराने शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. शिक्षकांच्या मुलांना निशुल्क शिक्षण देण्याच्या निर्णयात तब्बल २६ वर्षांनंतर दुरुस्ती झाल्याने राज्याच्या तिजोरीवरील भार हलका होणार आहे.

राज्य सरकारने १९ ऑगस्ट १९९५ ला मान्यताप्राप्त अनुदानित शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी दोन मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा घेतला होता. मात्र, राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार पडू लागल्याने शालेय शिक्षण विभागाने त्यात दुरुस्ती केली. नव्या निर्णयात मान्यताप्राप्त अनुदानित शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांना पहिली ते पदव्युत्तरपर्यंत सवलतीत शिक्षण मिळणार आहे.

पहिली ते दहावीचे शिक्षण मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक शाळेतून तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण तंत्रशाळा अथवा संस्थेतून घेता येणार आहे. दहावी ते बारावी, बारावीनंतर पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठ, औद्योगिक, व्यावसायिक शिक्षण संस्था, महाविद्यालयातून घेण्याची सवलत आहे. तसेच बारावी ते पदव्युत्तर शिक्षण शासकीय वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.

यांना मिळणार नाही लाभ

अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांना तसेच निवृत्त, बडतर्फ, शिस्तभंगाची कारवाई झालेल्यांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी तिमाही हजेरीद्वारे एकूण वर्षभरात त्या मुलाची उपस्थिती ७५ टक्‍के बंधनकारक आहे; अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच, योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून ३० दिवसांत कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

"शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी दोन मुलांना मोफत शिक्षण देण्याऐवजी शैक्षणिक अर्थसहाय देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे."

- सुरेश पाटील, अध्यक्ष, शिक्षणप्रसारक मंडळ, शिरोली पुलाची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT