शिक्षकांचा पगारासाठी नेहमीचाच शिमगा Esakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांची पगार 1 तारखेला नाहीच! बॅंकांचे हप्ते भरायची पंचाईत

स्वत:च्या हक्‍काचे घर आणि कुटुंब चालवत चालवत मुलांना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न उराशी बाळगून बहुतेक शिक्षक नोकरी करतात. त्यासाठी बऱ्याच शिक्षकांनी पगारीवर बॅंकांकडून कर्ज काढले आहे. त्यांच्या कर्जावरील हप्ता महिन्याच्या सुरवातीला भरावाच लागतो, अन्यथा दंडाचा भुर्दंड सोसावा लागतो.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : स्वत:च्या हक्‍काचे घर आणि कुटुंब चालवत चालवत मुलांना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न उराशी बाळगून बहुतेक शिक्षक नोकरी करतात. त्यासाठी बऱ्याच शिक्षकांनी पगारीवर बॅंकांकडून कर्ज काढले आहे. त्यांच्या कर्जावरील हप्ता महिन्याच्या सुरवातीला भरावाच लागतो, अन्यथा दंडाचा भुर्दंड सोसावा लागतो. मुलांना शिक्षण देऊन भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना दरमहिन्याच्या 1 तारेखला पगार मिळावा, असा नियम आहे. पण, जिल्ह्यातील शिक्षकांना मागील वर्षभरात 7 तारखेपूर्वी कधीच पगार मिळाला नाही.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार 796 शाळा असून त्याठिकाणी 11 हजारांहून अधिक शिक्षक आहेत. तर 332 खासगी प्राथमिक शाळा असून त्याअंतर्गत जवळपास दोन हजार 800 शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हाभरात माध्यमिकच्या 650 शाळा असून 112 महाविद्यालये आहेत. त्याठिकाणी 13 हजार 800 शिक्षक काम करतात. त्या सर्व शिक्षकांच्या पगारीसाठी दरमहा जवळपास 260 कोटी रुपये लागतात. काही वर्षांपूर्वी शिक्षकांचे वेतन अनियमित होत असल्याने संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने यापुढे शिक्षकांना दरमहा 1 तारखेला वेतन मिळेल, अशी ग्वाही देऊन त्यासंबंधीचा आदेशही काढला होता. मात्र, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे कारण पुढे करून आता शिक्षकांच्या पगारी वेळेवर दिल्या जात नाहीत. काही मोजक्‍या शिक्षकांना पगार विलंबाने झाल्यास फारशा अडचणी येणार नाहीत, पण बहुतेक शिक्षकांना त्याचा निश्‍चितपणे त्रास सोसावा लागत आहे. बॅंकांचा हप्ता वेळेवर न गेल्याने अनेकांना भुर्दंड सोसावा लागतोय, हीदेखील वस्तुस्थिती आहे. आता शिक्षकांच्या पगारी वेळेत दर महिन्याच्या 1 तारखेला कधीपासून होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांची स्थिती...
झेडपीचे अंदाजित शिक्षक
11,000
खासगी प्राथमिकचे शिक्षक
2,800
माध्यमिकचे शिक्षक
13,800
दरमहा पगाराची रक्‍कम
260 कोटी

कोरोनामुळे शिक्षकांच्या पगारी 1 तारखेला होत नाही ही वस्तुस्थिती आहे. कोरोनापूर्वी दोन-तीन महिन्यांच्या पगारीची रक्कम एकदम यायची. पण, कोरोनाच्या संकटामुळे पगारीची रक्‍कम दरमहा मिळत असल्याने शिक्षकांच्या पगारीसाठी थोडासा विलंब होऊ लागला आहे.
- प्रकाश मिश्रा, वेतन अधीक्षक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT