MLA Shashikant Shinde son Tejas Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : आमदार शिंदेंच्या सुपुत्राला राष्ट्रवादीनं दिली मोठी जबाबदारी; 'या' पदावर केली नियुक्ती

राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षपदाचा श्री. शिंदे यांनी मध्यंतरी राजीनामा दिला होता.

सकाळ डिजिटल टीम

यापुढील काळात देखील पक्षानं दिलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन नेटानं पार पाडणार असल्याचं तेजस शिंदे (Tejas Shashikant Shinde) यांनी म्हटलं आहे.

सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवा नेते तेजस शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तिपत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.

राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षपदाचा श्री. शिंदे यांनी मध्यंतरी राजीनामा दिला होता. युवकचे सातारा जिल्हाध्यक्ष व नवी मुंबई प्रभारी असताना त्यांनी राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून अनेक आंदोलने, तसेच सामाजिक उपक्रम राबवले होते. आता त्यांच्याकडं युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षानं दिली आहे. यापुढील काळात देखील पक्षानं दिलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन नेटानं पार पाडणार असल्याचं तेजस शिंदे (Tejas Shashikant Shinde) यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचे विचार विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात पोचवणार आहे, असे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींसह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT