Tejsvini Pandit_Raj Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरेंची सत्ता नाही हे त्यांचं नव्हे महाराष्ट्राचं दुर्दैव! तेजस्वीनीनं मांडलं रोखठोक मत

तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही, अशा शब्दांत तिनं राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त राज्यभरातून विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठी सिनेसृष्टीतल्याही अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत हिनं देखील राज ठाकरेंना हटके स्वरुपात शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना तिनं मोठं राजकीय विधानंही केलं आहे. (Tejswini Pandit writes post on Social Media on the occastion of birthday of MNS Leader Raj Thackeray)

काय म्हणाली तेजस्वीनी पंडीत?

तेजस्वीनीनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, "स्वतःच्या हिंमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला. तो वाढवलात, वृधिंगत केलात. इतकी वर्षे पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंबप्रमुख बनून एवढी कुटुंबं जपलीत. स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत. राजकारणात मैत्री आणली नाही आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. So called fast lifeमध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या आयुष्‍यात ठेहराव आणलात आणि आमच्‍या मनात अढळ स्‍थान निर्माण केलंत" (Latest Marathi News)

"हा Never Give up Attitude इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात? राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे. कारण कर नाही त्याला डर कशाला! मुख्‍य म्‍हणजे तुमच्‍या जाणिवा अजूनही जिवंत आहेत" (Marathi Tajya Batmya)

"तुमच्‍या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं. राज ठाकरे यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे!! तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं यासाठी मी स्‍वामींची आभारी आहे", अशा शब्दांत तेजस्वीनी पंडीत हीनं राज ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT