Mandhardev Kaleshwari Devi esakal
महाराष्ट्र बातम्या

Kalubai Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील 'हे' प्रसिद्ध मंदिर आठ दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

मंदिर 21 ते 28 सप्टेंबर या काळात दर्शनासाठी बंद राहणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मांढरदेव येथील काळेश्वरी किंवा काळूबाई देवीचे मंदिर महारष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यांतील भाविकांचं श्रद्धास्थान आहे.

सातारा : मांढरदेव (ता. वाई) येथील काळेश्वरी देवीच्या (Mandhardev Kaleshwari Devi) मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून (गुरुवार) २८ सप्टेंबरअखेर बंद ठेवल्याची माहिती मांढरदेव देवस्थानच्या वतीने देण्यात आली.

मात्र, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी काळेश्वरी देवीच्या (Kalubai Temple) उत्सव मूर्तीचे दर्शन सभा मंडपात सुरू ठेवले जाणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष, सत्र जिल्हा न्यायाधीश यांनी कळविले आहे.

सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थानच्या वतीने केले आहे. मांढरदेव येथील काळेश्वरी किंवा काळूबाई देवीचे मंदिर महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यांतील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दरवर्षी उत्सव काळातच नव्हे तर दररोज देखील भाविक दर्शनसाठी गर्दी करतात.

मात्र, देवीच्या मुख्य गाभाऱ्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यामुळे या काळात भाविकांची थोडी गैरसोय होणार आहे. हे मंदिर 21 ते 28 सप्टेंबर या काळात दर्शनासाठी बंद राहणार आहे. या दिवसांत भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

Nagpur Exam Management: नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी डॉ. अनुप पळसोकर; विस्कळीत परीक्षा व्यवस्थेला रुळावर आणण्याचे मोठे आव्हान

सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार

SCROLL FOR NEXT