vidhan-bhavan 
महाराष्ट्र बातम्या

हिवाळी अधिवेशन : १० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ!

आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच दहा जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले आहेत. यामुळं खळबळ उडाली आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जवळपास ३,५०० जणांची RT-PCR चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये ८ पोलीस आणि २ अधिवेशनातील कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंगही अद्याप झालेलं नाही. याद्वारे पॉझिटिव्ह असलेल्यांपैकी कोणी ओमिक्रॉन व्हेरियंटनं बाधिता आहे की नाही हे कळू शकेल. पण अद्याप जिनोम सिक्वेंसिंगचा निर्णय झाला नसल्याचं सूत्रांकडून कळतं.

राज्यात काल ८२५ नवे रुग्ण

दरम्यान, राज्यात काल 825 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर 14 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळं मृतांचा एकूण आकडा 1,41,367 वर पोहोचला. औरंगाबाद, लातूर, नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 4, पुणे 1, नाशिक 7, कोल्हापूर 1, अकोला येथे एक मृत्यू नोंदवले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

IAS Officer Tukaram Mundhe : "मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,"; तुकाराम मुंढेंच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

SCROLL FOR NEXT