सोलापूर महानगरपालिका Sakal
महाराष्ट्र बातम्या

घरात भाडेकरू, तरीपण मालकच भरतोय टॅक्स! सोलापूर महापालिका हद्दीतील प्रकार; एप्रिलपासून सर्वच मिळकतदारांची होणार फेरतपासणी

सोलापूर शहरातील अनेक मिळकतदारांनी घरगुती जागेचा व्यावसायिक वापर सुरू केलाय तर अनेकांनी पूर्वीच्या बांधकामात वाढ केली. काहींनी नवीन व्यवसाय सुरू केले, शेकडो घरांमध्ये भाडेकरू आहेत. पण, याची संपूर्ण माहिती महापालिका अधिकाऱ्यांना नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील अनेक मिळकतदारांनी घरगुती जागेचा व्यावसायिक वापर सुरू केलाय तर अनेकांनी पूर्वीच्या बांधकामात वाढ केली. काहींनी नवीन व्यवसाय सुरू केले, शेकडो घरांमध्ये भाडेकरू आहेत. पण, याची संपूर्ण माहिती महापालिका अधिकाऱ्यांना नाही. शहर पोलिसांकडेही भाडेकरूंची माहिती नाही. भाडेकराराची माहिती महापालिकेला दिल्यास मूळ मालकापेक्षा १० टक्के टॅक्स जास्त भरावा लागतो. त्यामुळे भाड्यातून आपल्याला मिळणारी रक्कम कमी होईल म्हणून मूळ मालकच महापालिकेत टॅक्स भरत आहेत.

सोलापूर शहरात दोन लाख ३० हजार घरगुती मिळकती आहेत. तर व्यावसायिक मिळकतींची संख्या २५ हजारांपर्यंत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात महापालिकेला कररूपाने ३११ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. पण, अजूनही पावणेदोनशे कोटी रुपयांचा कर मिळकतदारांनी भरलेला नाही. पुढील आठवड्यापासून ११० कर्मचाऱ्यांना परिसरनिहाय थकबाकीदारांची यादी देऊन करवसुली केली जाणार आहे. पण, दरवर्षी महापालिकेच्या खर्चाची मदार केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या जीएसटी अनुदानावरच आहे.

जीएसटीतून महापालिकेला दरमहा २६ कोटी नऊ लाख रुपये मिळतात. मिळकतदारांचा पारदर्शक सर्व्हे करून मालमत्तेचे स्वरूप, त्यावरील बांधकाम व मिळकतीचा वापर, यावर कर आकारणी केल्यास महापालिकेचे उत्पन्न किमान ५० कोटींपर्यंत वाढू शकते. दुसरीकडे कर थकविणाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचा इशारा देऊनही महापालिकेकडून काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे देखील कर थकविणाऱ्यांची व थकबाकीची रक्कम वाढत आहे.

भाडेकरूंची माहिती मिळत नाही, पण...

घरमालकाने भाडेकरू ठेवल्यास त्यांना एकूण टॅक्सच्या १० टक्के जास्त कर भरावा लागतो. पण, अनेकजण भाडेकरार करून त्यासंदर्भातील माहिती महापालिकेला कळवत नाहीत. नवीन आर्थिक वर्षात शहरातील सर्व मिळकतींचा सर्व्हे करताना तशी माहिती समोर येईल.

- युवराज गाडेकर, करसंकलन प्रमुख, सोलापूर महापालिका

स्वतःच्या फायद्यासाठी मूळ मालकांची शक्कल...

मूळ मालकाकडून भाडेकरूसोबत ११ महिन्यांचा रीतसर भाडेकरार केला जातो, पण त्याची नोंद किंवा माहिती महापालिकेला दिली जात नाही. सध्या सोलापूर शहरात सहा ते १२ हजार रुपयांपर्यंत (घराचे आकारमान व सुविधांनुसार) भाडे घेतले जाते. मूळ मालकापेक्षा भाडेकरूला १० टक्के टॅक्स जास्त आकारला जातो. त्यामुळे ती रक्कम मूळ मालकाऐवजी महापालिकेला भरावी लागते. अशावेळी भाडेकरूकडून दरमहा भाडे घेऊन आपणच त्या घरात राहायला असल्याचे दाखवून मूळ मालक महापालिकेला दरवर्षी टॅक्स भरतो. मूळ मालकाला मात्र वार्षिक अंदाजे ६० हजार ते एक लाख रुपये मिळतात.

शहरातील मिळकतींची स्थिती

  • घरगुती मिळकती

  • २.३० लाख

  • व्यावसायिक मिळकती

  • २५,०००

  • भाडेकरारावरील अंदाजे मिळकती

  • ४,०००

  • मालक-भाडेकरूंच्या करातील तफावत

  • १० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT