TET And MHADA Exam Scam Accused Corona Positive  sakal
महाराष्ट्र बातम्या

TET आणि MHADA परीक्षा घोटाळ्यातील आरोपींना कोरोनाची लागण

सकाळ डिजिटल टीम

पुणे : टीईटी आणि म्हाडा परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी (TET And MHADA Exam Scam) अटकेत असलेल्या पाच आरोपींना कोरोनाची लागण (TET And MHADA Exam Scam Accused Corona Positive) झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.

टीईटी आणि म्हाडा परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट यांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे पाचही आरोपी अटकेत असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. तसेच पाचही जणांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचीही माहिती मिळतेय.

काही दिवसांपूर्वी टीईटी आणि म्हाडाचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे परीक्षा वेळेवर रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना संताप व्यक्त केला होता. पण, यामध्ये मोठा घोटाळा असल्याचे समोर आले होते. राज्य सरकारने कसून चौकशी केली असता याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी झपाट्यानं वाढत आहे. देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यापैकी मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तसेच राज्यातील पोलिस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. हे पाचही आरोपी कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही लागण झाली असावी, असं बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT