TET 2025 Sakal
महाराष्ट्र बातम्या

‘टीईटी’चा निकाल १५ जानेवारीपूर्वी! उत्तरसूचीवरील आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रत्येक उत्तरपत्रिकेची होणार फेरपडताळणी, पुढच्या वर्षी दोनदा ‘टीईटी’

नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल १५ जानेवारीपूर्वी जाहीर होणार असून, तसे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. डिसेंबरअखेर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध होईल. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांचे पेपर परीक्षा परिषदेकडून तपासले जातील आणि अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल १५ जानेवारीपूर्वी जाहीर होणार असून, तसे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. डिसेंबरअखेर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध होईल. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांचे पेपर परीक्षा परिषदेकडून तपासले जातील आणि अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षक म्हणून नोकरीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक आहे. यापूर्वी ‘टीईटी’ उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रे, उत्तरपत्रिकांमध्ये गुण वाढविण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे आता ‘टीईटी’च्या उत्तरपत्रिकांची दोनदा तपासणी होते. एजन्सीतर्फे वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरपत्रिका (ओएमआर) तपासून झाल्यावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासल्या जातात; जेणेकरून कोणताही गैरप्रकार होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे.

परीक्षा देखील आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत होतात. यंदा ‘टीईटी’च्या दोन्ही पेपरसाठी साडेतीन लाख उमेदवार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सेवेतील ५० हजारांहून अधिक शिक्षकांनी देखील ‘टीईटी’ दिली आहे. त्या सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

वर्षात दोन ‘टीईटी’ घेण्याचे नियोजन

२३ नोव्हेंबरला झालेल्या ‘टीईटी’च्या उत्तरसूचींचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. उत्तरसूची प्रसिद्ध करून त्यावरील हरकती तथा आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर अंतिमसूची जाहीर होईल. १५ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन सुरू आहे. आगामी वर्षात दोन ‘टीईटी’ होतील, असेही नियोजन केले जात आहे.

- डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

जून अन्‌ नोव्हेंबरमध्ये ‘टीईटी’चे नियोजन

सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील सर्व शिक्षकांसाठी (सेवानिवृत्तीला पाच वर्षे कमी असलेले वगळून) ‘टीईटी’ बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर जूनमध्ये पुढची टीईटी आणि नोव्हेंबर महिन्यातही टीईटी घेण्यात येणार आहे; जेणेकरून शिक्षकांना न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या मुदतीत जास्तीत जास्त ‘टीईटी’ देता येतील, हा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election : राष्ट्रवादीची लवकरच पॅनेलनिश्‍चिती; ४५० इच्‍छुकांच्या मुलाखती; ख्रिसमसनंतर घोषणेची शक्यता

Latest Marathi News Live Update : मनसे शिवसेना उबाठा युती, कात्रज चौकात वसंत मोरेंचा जल्लोष

Ashta Shirol Election : आई आष्ट्यात, मुलगी शिरोळमध्ये विजयी; प्रभाग पाचने दिला मायलेकीला राजकीय कौल

Sangli Farmer : कांडी मागे पडली! सांगलीत ऊस रोपांची लागवड जोमात, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे बळ

Nagpur Crime : शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरला अटक; शासनाला १२ कोटींचा फटका

SCROLL FOR NEXT