Moharram 
महाराष्ट्र बातम्या

मोहरमनिमित्त ठाकरे सरकारची नवी नियमावली

सकाळ डिजिटल टीम

मोहरमच्या पार्श्वभूमीवर सरकरने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनामुळे काही निर्बंध सरकारने लागू केले आहेत.

मुंबई - मोहरमच्या पार्श्वभूमीवर सरकरने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनामुळे काही निर्बंध सरकारने लागू केले आहेत. वाझ मजलीस तसंच मातम मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सरकारने केलं आहे. घरात राहून दुखवटा पाळा असंही राज्य सरकारने म्हटलं आहे. मोहरम ताजिया काढू नये आणि साध्या पद्धतीने मोहरम पाळण्यात यावा असं राज्य सरकारने सांगितलं आहे.

यावर्षी मोहरम दि. 19 ऑगस्ट, 2021 रोजी पाळण्यात येणार आहे. मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लीम बांधवांतर्फे वाझ मजलीस तसेच मातम मिरवणूका आयोजित करण्यात येतात. कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले असल्याने इतर कार्यक्रमाप्रमाणेच या वर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

मोहरम महिन्याच्या 9 व्या दिवशी म्हणजेच दि. 18 ऑगस्ट रोजी "कल की रात" तसेच 10 व्या दिवशी "योग-ए-आशुरा" हे दिनांक 19 ऑगस्ट रोजी येत असून त्या निमित्ताने मातम मिरवूणका काढण्यात येतात. परंतू सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवूणका काढता येणार नाही.

मातम मिरवणूक- कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम / दुखवटा करु नये.

वाझ मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया / आलम ताजिया / आलम काढू नयेत.

सबील/छबील- सबील छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे असं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT