चिन्ह आणि नाव देताना शिंदे गटाला झुकतं माप देण्यात आले असा गंभीर आरोप करत ठाकरे गटाने निवडणुक आयोगाला पत्र लिहलं आहे. तसेच ठाकरे गटाला सापत्न वागणून देण्यात आली आहे. आयोगाकडून आमच्यासोबत भेदभाव झाला असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. या पत्रात एकूण १२ मुद्दे मांडण्यात आले आहेत. (Thackeray Group Allegation Of Shinde Group on In Letter To Election Commission maharashtra politics)
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिलं असून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाला मान्यता दिली. तसंच आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अशी नविन पक्षनावं दिली. मात्र, ठाकरे गट नाराज असल्याचे समजते. त्यांनी १२ मुद्याच पत्र लिहित निवडणुक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हटले आहे पत्रात?
नाव आणि पक्षचिन्ह वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून यामध्ये १२ मुद्दे मांडण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात पक्षपातीपणा केल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. पत्रातून आयोगाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.
आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जे जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे वकिल विवेक सिंह यांनी हे पत्र निवडणूक आयोगाकडे सोपवलं आहे.
ठाकरे गटाला मशालचं चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाला नेमकं कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगानं आपला निर्णय जाहीर केला असून शिंदे गटाला म्हणजेच 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाला 'ढाल-तलवार' हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाने त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणुक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य, त्रिशूळ या चिन्हांवर दावा केला त्यासोबतच शिंदे गटाने गदा हा पर्याय देखील दिला होते. मात्र, धार्मिक मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची त्रिशुळ आणि गदा ही चिन्ह बाद केली. मात्र उगवता सूर्य या चिन्ह आधीच एका पक्षाचं चिन्ह असल्याने ते कुणालाही दिले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.