Shivsena Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: CM शिदेंचं टेन्शन वाढलं; कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे उचलणार मोठं पाऊल?

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज विधानसभा सचिवांची भेट घेणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गट अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज सकाळी 11 वाजता विधान सभा सचिवांची भेट घेणार आहेत. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या संत्तासंघर्षावर निकाल दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

अनिल परब हे आज ११ वाजता सचिवांची भेट घेणार आहेत. या भेटीवेळी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करून आपत्र आमदारांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, यासाठी परब सचिवांना निवेदन देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

शिवसेनेतील 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधान सभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामुळे विधान सभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशातच आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब विधान विधानसभा सचिवांची भेट घेणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार अपात्र आमदारांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा मागणीचं निवेदन ते सचिवांना देण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिले आहेत?

सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल देताना न्यायालयाकडून शिंदे गट आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. शिंदे गटाने नियुक्त केलेले मुख्य प्रतोत भारत गोगावले यांची नियुक्ती देखील घटनाबाह्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. त्याचबरोबर आमदारांच्या अपात्रेसंदर्भात विधान सभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar Detained : कन्हैया कुमार यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; अटकेवरून राजकीय वाद

Brazil Football: ब्राझीलचा फुटबॉल संघ भारतात येणार? कोलकात्यात रंगू शकतो मेगा सामना; रिपोर्टने वाढवल्या चाहत्यांच्या आशा

Talbehat Killa: या किल्ल्याच्या भिंतींमध्ये दडलाय ७ मुलींच्या बलिदानाचा इतिहास; जाणून घ्या प्रवेशद्वारावरील गूढ मूर्त्यांचे रहस्य

Live Updates Marathi : विठ्ठलनामाच्या गजरात नंदवाळकडे पन्नास हजार वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, मला इथंच रहायचंय; फडणवीस दिल्लीत जाणार का? प्रश्नावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT