Uddhav Thackery  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: ठाकरे गटातील नेत्याकडून शिंदे गटातील आमदाराच कौतुक; चर्चांना उधाण

ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी बंडखोर आमदार बच्चू कडू यांचं कौतुक केलं आहे

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी बंडखोर आमदार बच्चू कडू यांचं कौतुक केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना सचिन अहिर म्हणाले की, मी बच्चू कडू यांचं जाहीर अभिनंदन करतो. खोके मिळाले नाही मिळाले हे मला माहिती नाही. मी त्यामध्ये जाऊ इच्छित नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. पण या सत्तांतरानंतर किमान त्यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय हवं अशी अनेक वर्षांची त्यांची मागणी होती आणि त्यांनी ती मागणी मंजूर करून घेतली त्याबद्दल मी या व्यासपीठावर त्यांचं जाहीर कौतुक करतो असं आहीर म्हणाले आहेत.

जे चांगलं आहे तर चांगलं बोलायला आपण पुढे मागे पहिलं नाही पाहिजे. बच्चू कडू जर सूरत, गुवाहाटीला गेले नसते तर कदाचित हा विभाग झाला नसता असंही आहीर म्हणाले आहेत. सचिन आहीर यांच्याकडून बंडखोर आमदार बच्चू कडू यांचं कौतुक केल्यामुळे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय नेत्याच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे आणि 40 समर्थक आमदार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यावर कायमच टीका केली जाते. परंतु कडू यांच्या दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय या मागणीमुळे विरोधकही त्यांचं कौतुक करत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावं म्हणून आमदार बच्चू कडू अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. अखेर त्यांच्या लढ्याला आज यश आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT